प्रशासनाने दखल घ्यावी !!!!

 पं.स.समोर तीन दिवसांपासून उपोषण: आंदोलकाची प्रकृती बिघडली; उपजिल्हा रुग्णालयात हलविले

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

 १५ वा वित्त आयोग या अंतर्गत जी कामे झाली आहेत. त्या कामाची चौकशी करा गावा अंतर्गत पाणंद रस्ते व खडीकरणाच्या रस्त्याची चौकशी करावी या प्रमुख मागण्यांसाठी पं.स.समोर तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे.आंदोलक विजय बडे यांची प्रकृती बिघडली असुन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

रेवली येथील ग्रामपंचायत सदस्य विजय बडे यांनी विविध मागण्यांबाबत तीन दिवसांपासून उपोषण सुरु केलेले आहे.आज त्यांची प्रकृती बिघडली आहे.

 भ्रष्ट व कामचुकार,  सतत अपमान जनक वागणुक देणा-या ग्रामसेवकांना निलंबीत करण्यात यावे, 15 वा वित्त आयोग, 9010, 2545 अंतर्गत सर्व कामांची चौकशी करुन संबंधीत अधिकारी वे ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, गाव अंतर्गत पांदन रस्त व खडीकरण रस्ते यांची चौकशी करुन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावा., गट-ब व गट-क अंतर्गत झालेल्या रेवली पाटी ते. जिल्हा परिषद शाळा पर्यंत झालेल्या डांबरीकरण रस्त्याची चौकशी करून संबधीत अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करुण कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, संबंधित अधिकाच्यां तात्काळ निलंबीत करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

   तीन दिवसापासून परळी पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे.आंदोलक विजय बडे यांची प्रकृती बिघडली असुन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !