रा. से. यो. वतीने  वसंतनगर येथे ग्राम परिसर स्वच्छता व डिजिटल लिटरसी उपक्रम  

परळी - वैः - वसंतनगर येथे  वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दिनांक २५ जानेवारी २०२५ ते दिनांक २६ जानेवारी  रोजी  युथ फॉर भारत ॲन्ड युथ फॉर डिजिटल लिटरसी ही संकल्पना घेऊन  सात दिवशीय निवासी शिबीर वसंतनगर ग्राम व सखाराम नाईक शैक्षणिक संकुलन श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच संगणक डिजीटल कांती आणि आपण विषयावर प्रा. व्हि. व्हि. मुंडे तर डिजीटलायझेशन व  व्यापार या विषयावर प्रा. सागर शिंदे यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. माधव  रोडे तर प्रमुख पाहुणे प्राचार्य अरुण पवार , प्रा. भिमानंद गजभारेहोते. कॉर्मस विभागाचे प्रा. सागर शिंदे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले  डिजिटल कॉमर्स म्हणजे एका शब्दात "पैसे".  आजच्या काळात बाजारपेठेतील गरज, पुरवठा साखळी आणि लोकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जोडण्याची प्रक्रिया डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे केली जाते.  डिजिटल तंत्रज्ञानाने वस्तू, माहिती, आणि लोकांना जोडले आहे. यामध्ये परस्पर जोडणी, डिजिटल मेमरी, कंपन्यांचे इंटरकनेक्टेड सर्व्हर्स, डेटा गोपनीयता, डेटा विक्री आणि व्यापार यांचा समावेश आहे. आजचा स्मार्टफोन आपल्यावर पाळत ठेवतो, आणि आपण डिजिटल प्लॅटफॉर्मचे मजूर बनलो आहोत.  तर संगणक विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही . मुंडे म्हणाले  कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही मानवी मेंदू व विचार करण्याच्या क्षमतेसारखी कार्य करणारी प्रणाली आहे.  डिजिटल साक्षरता आज गरज आहे कारण देशात  आज 23% लोक वाचायला व लिहायला अक्षम आहेत, तर 77% साक्षर लोकांना डिजिटल जगात ईमेल कसे वापरायचे हेही माहित नाही. यामुळे डिजिटल साक्षरतेची गरज निर्माण झाली आहे. भविष्यात कोणत्याही नोकरीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे ऑपरेशन करणे अपरिहार्य ठरणार आहे. याकार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने विशेष सहभाग सागर जगताप , प्रणव आघाव , अभिजीत रोडे , महेश मुंडे , करण गुट्टे , युगराज गुट्टे , संतोष घनगाव, अक्षय बनसोडे , आशिष मुंडे , किरण गुट्टे , चैतन्य गीत्ते , ओकेश बांगर , सुंमित गोडबोले घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार