अखिल भारतीय ग्राहक पंचायत परळी वैजनाथचे कार्य कौतुकास्पद - डाॅ.किरण पारगावकर 


ग्राहक पंधरवाडा निमित्त गाठीभेटी 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

      अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा परळी वैजनाथ च्या वतीने ग्राहक पंधरवाडा निमित्त परळी शाखेतील जुने दिवंगत कार्यकर्ते कै. शशिकला विशंभरराव पारगावकरयांच्या कुटुंबांची भेट घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्या मध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचा सहभाग किती मोलाचा होता. त्यांनी कार्य कशाप्रकारे केले.आजही आम्हाला त्यांच्या आठवणी येतात. चित्राताई त्यावेळी त्यांच्या सोबत होत्या.म्हणून त्यांना त्यांचे कार्य बद्दल, चर्चा करताना. प्रत्येक गोष्ट आठवत होती.त्यांचे कार्य किती मोलाचे ठरले याबद्दल दिवंगत कार्यकर्त्याचा मुलगा डॉक्टर किरण पारगावकर यांच्याशी चर्चा आमच्या संघटनेच्या अध्यक्षा चित्र देशपांडे व संघटन मंत्री विजयाताई दहिवाळ आणि सल्लागार अशोक शहाणे यांनी चर्चा करून त्यांना दिवंगत सौ शशिकला विश्वंभरराव पारगावकर यांच्या नांवे कृतज्ञता पत्र देऊन आभार व्यक्त केले.

        यावेळी डॉ. किरण पारगावकर यांनीही आपल्या आईच्या आठवणीला उजाळा दिला यावेळी आईच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले. व ते म्हणाले की आईचे राहिलेले कार्य मी पुढे चालू ठेवेल.आई ही शेवटी आईच असते तिची जागा कोणीच घेऊ शकत नसते. तिच्यामुळेच आज आपण येथे आहोत.असे उद्गार संघटन मंत्री विजयाताई दहिवाळ यांनी यावेळी काढले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतने आमच्या आईच्या कार्याची दखल घेऊन कृतज्ञता पत्र दिले.त्याबद्दल धन्यवाद डॉ. किरण पारगावकर यांनी व्यक्त केले.यावेळी संघटनेच्या अध्यक्षा चित्रा देशपांडे संघटन मंत्री विजयाताई दहिवाळउपाध्यक्ष विद्या खिस्ते, सल्लागार अशोक शहाणे , संध्या सरोदे, सुनिता बोडके आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार