प्रजासत्ताक दिनी मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
पुरस्कार विजेते पवार व देशपांडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
परळी /प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताकाचा ७६ वा दिनानिमित्ताने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाद्वारे बडोदा येथे ४६व्या आंतरगृह व बाह्यग्रह क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर गाजविणाऱ्या व या स्पर्धेत महानिर्मितीचे प्रतिनिधित्व केलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील विजेते कर्मचारी सखाराम देशपांडे व सुनील पवार यांना पुष्पगुछ, रोख रक्कम तसेच प्रशस्तीपत्र देऊन मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी गौरव केला.तसेच यापुढे परळी वीज निर्मिती केंद्राचा सर्वजण मिळून नावलौकिक करू असे सांगितले.
प्रजासत्ताक दिनी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांच्या हस्ते दि २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र सुरक्षा दल व मेस्कोच्या जवानांनी परेड सादर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता सुनिल इंगळे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले कि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी आपल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून अंमलात आणून नव्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात केली.
मुख्य अभियंता इंगळे पुढे म्हणाले कि, तिन्ही संच ६, ७ आणि ८ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत. आपली महानिर्मिती कंपनी कठीण परिस्थितून मार्गक्रमण करीत असून या परिस्थितीत सर्वानी आप आपली कर्तव्य जर चांगल्या प्रकारे पार पडली तर त्यातून भविष्यात येणाऱ्या सर्व जवाबदाऱ्या आपण चांगल्या प्रकारे पार पडून महानिर्मितीच्या भविष्य उज्वलतेकडे नेण्यासाठी व सर्वांगीन विकासासाठी कटिबद्ध राहू, प्रजासत्ताक दिनानिमित्त परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व अधिकारी, अभियंता, कर्मचारी, कंत्राटदार व कंत्राटी कामगार यांना शुभेच्छा त्यांनी दिल्या.
याप्रसंगी दरम्यान मुख्य ध्वजारोहण झाल्यानंतर थर्मल कॉलनी येथील क्रीडा संकुलात विविध सांस्कृतिक कार्यक्रमास मुख्य अभियंता सुनील इंगळे उपस्थिती लावून या ठिकाणीही ध्वजारोहण करण्यात आले.
न्यू हायस्कूल भेल, सेकंडरी स्कूल आणि विद्यावर्धिनीच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केले. विठ्ठल रुक्मिणी या गाण्यास तसेच गरबा नृत्यास प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस उपमुख्य अभियंता महाजन यांनी बक्षीस दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एच गित्ते मॅडम, राजू गजले, लक्ष्मण वाकडे यांनी केले
या प्रसंगी उप मुख्य अभियंता महेश महाजन, उप मुख्य अभियंता (प्रशासन) एच के अवचार, सुरेश गरजे,कार्यकारी अभियंता मदन पवार, सुरक्षा अधिकारी बी आर अंबाड, कल्याणाधिकारी शरद राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे, गौतम गायकवाड आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा