सोमवारपासून परळी न्यायालयाचे स्थलांतर डोंगरावरील शासकीय विश्रामगृहात! 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

       उच्च न्यायालय मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधीश बीड यांच्या आदेशाने परळी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे तीनही कोर्ट डोंगरावरील जुन्या शासकीय विश्रामगृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. सोमवारपासून नवीन इमारतीमध्ये न्यायालयाचे कामकाज चालू राहणार आहे.

याबाबत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल यावलकर यांनी कार्यालयीन आदेश जारी केला आहे .त्यामुळे परळी येथील न्यायालयाचे कामकाज दिनांक 13 जानेवारी 2025 पासून नवीन इमारतीमध्ये सुरू होणार आहे .सदर इमारत ही अंबाजोगाई रोडपासुन जवळ असून ती आयटीआय कॉलेजच्या समोर आहे. तेथील जुने शासकीय विश्रामगृहाचे रूपांतर तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयाच्या इमारतीमध्ये करण्यात आले आहे. परळी न्यायालयाची सध्याच्या इमारत जुनी झाली असून तेथे नवीन बांधकाम करण्यासाठी शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे

 त्यामुळे लवकरच परळी न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे. त्यामुळे सध्याची न्यायालये शासकीय विश्रामगृहामध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. याबाबत

परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड एच व्ही गुट्टे यांनी सदरची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपाची असून नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पुर्वीच्या जागेत न्यायालय पुन्हा येणार आहे. त्यामुळे पक्षकार व वकिल मंडळी यांनी सदर बदलाची दखल घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी  नवीन इमारतीची पाहणी परळी वकील संघाचे अध्यक्ष ऍड एच व्ही गुट्टे ॲड आर.व्हि.गित्ते ॲड प्रदिप गिराम  ॲड वसंतराव फड ॲड डि एल उजगरे सचिव ॲड शेख शकीक ॲड दिलीपमामा उजगरे ॲड सायस मुंडे  ॲड प्रविण फड ॲड संजय डिघोळे ॲड धनाजी कांबळे ॲड सय्यद सुल्तान ॲड दत्तात्रय जाधवर ॲड एजाज ॲड लाला खान इत्यादी यांनी सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार