नगरपरिषदेचे वरातीमागून घोडे !

 'त्यामुळे' अखेर परळीच्या ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई टाॅवर चे प्रवेशद्वार केले बंद!

परळी वैजनाथ नगरपरिषदेचे वरातीमागून घोडे

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या राणी लक्ष्मीबाई टाॅवर वर जाण्यासाठीचा मार्ग आणि प्रवेशद्वार नगरपरिषद प्रशासनाने आज तात्पुरता बंद केला आहे.वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही उपाय योजना केली आहे.

          मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मीक कराड यांच्या समर्थकांनी काल दिवसभर परळी शहरात विविध प्रकारची आंदोलने केली होती. कराड समर्थक आक्रमक होत परळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई टाॅवरवर चढले होते. राणी लक्ष्मीबाई टाॅवरवर जाण्यासाठी एक प्रवेशद्वार असून या प्रवेशद्वारातूनच हे आंदोलनकर्ते टॉवरच्या शिखरापर्यंत गेले होते. अशा प्रकारची घटना सद्य परिस्थितीत पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना म्हणून नगर परिषद प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात या प्रवेशद्वाराला पत्रे ठोकून हे प्रवेशद्वारच आता बंद करून टाकले आहे.

नगरपरिषदेचे वरातीमागून घोडे

        गेल्या अनेक वर्षापासून राणी लक्ष्मीबाई टॉवरच्या प्रवेशद्वाराला दरवाजा आहे. या दरवाजाला पुर्वी कुलूपही लावलेले असायचे तसेच न.प.कडून देखभालीसाठी कर्मचारीही नियुक्त असायचा. मात्र गेल्या काही वर्षात हे कुलूपही काढून टाकण्यात आलेले आहे. या ठिकाणचा दरवाजाही नगर परिषदेच्या दुर्लक्षाने निघून पडला. त्यामुळे हे प्रवेशद्वार मोकळे झाले होते. राणी लक्ष्मीबाई टाॅवर हे शहराच्या बाजारपेठेच्या मध्यवर्ती असे ठिकाण आहे. या ठिकाणी न.प.च्या वतीने सूचना देण्यासाठीचा भोंगाही लावण्यात आलेला होता. त्याच बरोबर बाजारपेठ बंद करण्याची दररोजची सूचना या भोंग्याद्वारे  दिली जात असायची. गेल्या अनेक वर्षात या ठिकाणचा भोंगा काढून टाकण्यात आला असुन बाजारपेठ बंद करण्याची दररोज रात्रीची ८.३० वा. भोंगा वाजून  दिली जाणारी सूचनाही त्यामुळे बंद झालेली आहे. या ठिकाणी पोलीसांकडून राष्ट्रीय सणाचे ध्वजारोहणही होत असते. मात्र गेल्या काही वर्षात राणी लक्ष्मीबाई टाॅवरची दुरावस्था झालेली बघायला मिळते. या टॉवरची उपयोगिता नगरपरिषदेच्या दुर्लक्षाने हळूहळू संपवण्यात आलेली आहे.तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवरचे प्रवेशद्वार खुले राहिले तर कोणीही वर चढून जाऊ शकतो हे धडधडीत दिसत असतानाही यापूर्वी नगर परिषदेने या प्रवेशद्वाराला, दरवाजाला कुलूप लावण्याची तसदी कधीही घेतली नाही. दरम्यान, काल आलेल्या टोकाच्या अनुभवानंतर नगरपरिषद प्रशासनाला उशिरा का होईना परंतु शहाणपण सुचले असुन आता टॉवरवर चढण्याचा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात पत्रा ठोकून बंद करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !