रूजू झाल्यानंतर एसपी प्रथमच परळीत !

परळीतील अस्ताव्यस्त पार्किंग, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमणे व अनिर्बंध वाहतूकीवर कडक धोरण राबविणार - पोलीस अधीक्षक नवनीत काँवत

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
              परळी शहरासारख्या बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने अतिक्रमणे झालेली आहेत. त्याचबरोबर शहरातील ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पार्किंग, विशेषतः बाजारपेठेत रस्त्यावरच अतिक्रमणं असल्याने वाहनांची होणारी कोंडी आणि अनिर्बंध असलेल्या वाहतुकीवर लवकरच  कडक धोरण राबवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत  यांनी सांगितले.

    बीड जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी रुजू झाल्यानंतर आज(दि.8) पहिल्यांदाच परळी येथे भेट दिली. परळीतील तीनही पोलीस ठाण्यांना भेट देत त्यांनी प्रशासकीय संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन त्यांनी मनोभावे प्रभू वैद्यनाथाची पूजा व आरती केली. त्याचप्रमाणे  परळीतील प्रमुख संवेदनशील व महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने  सेक्रेटरी प्रा.बाबासाहेब देशमुख, विश्वस्त राजेश देशमुख, अनिल तांदळे आदींनी त्यांचा सत्कार केला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले,पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे ,पोलीस निरीक्षक नाचन आदी उपस्थित होते.
        
      जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी परळी शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाणे यांना भेट देत प्रशासकीय आढावा घेतला. त्या- त्या संबंधित ठाणेदारांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. याप्रसंगी परळीतील पत्रकारांच्या वतीनेही जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे प्रथमच परळीत आल्याबद्दल त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. यावेळी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण बीड जिल्ह्यातच आवश्यक ती सर्व काळजी, उपायोजना व धोरण राबविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले. परळी शहराच्या बाबतीत प्रामुख्याने त्यांनी सांगितले की, अवैध धंद्यांच्या बाबतीमध्ये आपले संपूर्ण जिल्ह्यातच कडक धोरण राहणार आहे. त्यादृष्टीनेच काम सुरु आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न  आहे. परळी शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीची समस्या, अनिर्बंध वाहतूक, रस्त्यावरील वाढलेली अतिक्रमणे वाहतुकीला अडथळा निर्माण करत असून बाजारपेठ असो हे शहरातील मुख्य रस्ते या रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंग व वाहतुकीला अडथळा होणारी अतिक्रमणे हटवून अतिक्रमणमुक्त, अडथळामुक्त रस्ते करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेबाबत आवश्यक ते सर्व धोरण गांभीर्याने राबविण्यात येणार असल्याचे  पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सांगितले.

       दरम्यान, बीड जिल्ह्यातील तसेच परळी शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्याच्यादृष्टीने सर्वांच्या सहकार्यातून पोलीस प्रशासन काम करत आहे.या अनुषंगाने सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार