इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

कॉलेज अध्यक्ष आणि स्टाफकडून साक्षी देशमुखचे अभिनंदन!

 काव्या महिला कॉलेजची विद्यार्थीनी फॅशन डिझाईन स्पर्धेत राज्यात प्रथम!

कॉलेज अध्यक्ष आणि स्टाफकडून साक्षी देशमुखचे अभिनंदन!

अंबाजोगाई प्रतिनिधी :-अंबाजोगाई येथील काव्य महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी देशमुख ही फॅशन डिझाईन स्पर्धेत राज्यात प्रथम अली आहे तिचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

 तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड आयोजित राज्यस्तरीय ड्रेस डिझाईनिंग स्पर्धा दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी बीड आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील बीड सह धाराशिव छत्रपती संभाजी नगर नांदेड यवतमाळ ठाणे, पुणे, परभणी, नाशिक लातूर मुंबई येथील जवळपास 130 स्पर्धक सहभागी झाले होते फॅशन डिझाईन अभ्यासक्रमामध्ये अनेक मुलींनी व महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला या या राज्यस्तरीय ड्रेस डिझायनिंग स्पर्धेमध्ये काव्य महिला महाविद्यालय अंबाजोगाई येथील आठ मुलींनी सहभाग नोंदीला त्यामध्ये सर्वप्रथम राज्यस्तरीय ड्रेस स्पर्धेमध्ये साक्षी देशमुख हिने पहिला क्रमांक पटकावला असून या यशामागे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष जयंत करपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काव्य महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या करुणा लोमटे मॅडम ,फॅशन डिजाईनचे प्राध्यापक शीला गायकवाड मॅडम ,आदमाने मॅडम पूजा नरवाडे मॅडम ,शिंदे निकिता मॅडम,प्रा शिशिकात राडे ,प्रा मुकुंद काळे सर्वांचा अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेल्या विद्यार्थिनीस मार्गदर्शन केले या सर्व मुळे महाविद्यालयाच्या शिरपेच्यात एक मानाचा तुरा रवला गेला आहे साक्षी देशमुख हिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून ही बाब महाविद्यालयासाठी अतिशय आनंदाची आणि इतर विध्यार्थी साठी प्रेरणादायी आहे असे संस्थेचे अध्यक्ष जयंत करपे यांनी भावना व्यक्त करून सांगितले आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या