युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

अभिमानास्पद: बीड जिल्हा बिहार नव्हे- रत्नांची खाण !

खो -खो विश्वचषक: केजच्या प्रियंका इंगळेची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड !

केज :-बीड जिल्ह्यातील कळमअंबा ता. केज येथील मूळ रहिवासी प्रियंका हनुमंत इंगळे या युवतीची "खो - खो " च्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तर १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या खो - खो वल्डकप स्पर्धेत प्रियंका ही भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे. 

  

केज तालुक्यातील कळमअंबा येथील हनुमंत इंगळे हे नोकरीच्या निमित्ताने मागील अनेक वर्षां पासून पुण्याला स्थायिक असून त्यांची कन्या प्रियंका इंगळे हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे पुणे येथील इंद्रायणी विद्यालयात झाले. तिने शालेय शिक्षण घेत असताना वयाच्या १४ व्या वर्षी पुण्यातील राजमाता क्रीडा मंडळात खो - खो च्या प्रशिक्षणास सुरुवात केली. तिने शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील खो खो स्पर्धेत सहभागी होऊन आपले नैपुण्य दाखविले. तिच्या अंगी असलेल्या कौशल्यामुळे तिला महाराष्ट्र खो खो संघाच्या कर्णधार पदाचा मान तीन वेळा मिळाला होता. आता ९ जानेवारी रोजी  "खो - खो " च्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. दिल्ली येथे १३ जानेवारीपासून होत असलेल्या खो खो वल्डकप स्पर्धेसाठी ती भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे. या स्पर्धेत २१ देशाचे संघ प्रतिनिधित्व करणार असून पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा खेळला जाणार आहे. तिला राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक अविनाश करवंदे मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या यशाबद्दल तालुक्यातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

प्रियंका अनेक पुरस्कार पटकावले 

      खो खो च्या भारतीय संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिने राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर क्रीडा पुरस्कार मिळविले असून तिला २०२३ - २४ चा छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

तिसऱ्या खेळाडूने मैदान गाजविले 

केज शहरातील कविता पाटील हिची भारतीय महिला क्रिकेट अ संघात निवड झाली होती. तर डोणगाव येथील ज्योतीराम घुले हा भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा कर्णधार असून आता प्रियंकाच्या निवडीमुळे केज सारख्या ग्रामीण भागातील खेळाडू जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण करीत आहेत. मात्र तालुक्यात खेळाडूंसाठी मैदान, प्रशिक्षण व इतर सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक खेळाडू जागतिक स्तरापासून वंचित राहिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या