शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेली समाजसेवा करावी-अभयकुमार ठक्कर
स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने बाळासाहेब ठाकरे चौकात अभिवादन व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन
परळी (प्रतिनिधी)
शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली समाजसेवा करावी अशी समाज सेवा केली तरच खर्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी केली असे होईल असे प्रतिपादन श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, परळीचे माजी नगराध्यक्ष अभयकुमार पप्पू ठक्कर यांनी केले. दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले तसेच भगव्या ध्वजाचे अनावरण अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
विश्वहिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त गुरूवार दि. 23 जानेवारी रोजी परळी वैजनाथ येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री ठक्कर बोलत होते.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना बीड उपजिल्हाप्रमुख अभयकुमार पप्पू ठक्कर बोलत होते. पुढे ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरेंनी मुळातच गोरगरिबांची सर्वसामान्यांची समाजसेवा करणे आणि तमाम हिंदू बांधवांचे संरक्षण करणे ह्याच कार्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि तमाम शिवसैनिकांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असा संदेश दिला आणी ह्या संदेशाच्या आधारावरच महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या पक्षाचे वटवृक्ष झाले आणि शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेनेच आमच्यासारखे शिवसैनिक तयार झाले. तेव्हा शिवसैनिकांनी आपणा स्वतःस समाजकार्यात वाहून घेत गोरगरिबांची आणि सर्वसामान्यांची सेवा करून त्यांच्या आडी अडचणीत मदत करावी जेणेकरून शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांचा खर्या अर्थाने शिवसेना पक्ष स्थापण्याचा उद्देश सफल होईल व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे साहेबांचेही हात बळकट होतील असेही उपजिल्हाप्रमुख अभयकुमार पप्पू ठक्कर म्हणाले.
यावेळी जय भवानी, जय शिवाजी, अमर रहे, अमर रहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे, तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय, आ...ब.. बं काय झाली गोष्ट जय महाराष्ट्र अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अतुल दुबे, माजी नगरसेवक रमेश चौंडे ,ज्येष्ठ नेते सतीश जगताप , तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, मनिष जोशी, दिनेश लोंढे,लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे,विजय पवार,योगेश जाधव, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, कृष्णा टेके,गणेश काकडे,रोहित बोले,आर्यन पोरे,कृष्णा बेदरकर, राहुल फुले यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा