अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत घेतले मार्गदर्शन
धनंजय मुंडे यांनी घेतली ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची सदिच्छा भेट अन् घेतले आशीर्वाद
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत घेतले मार्गदर्शन
मुंबई (दि. १०) - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले आहेत.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मागील काळामध्ये बरेच वर्ष अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री राहिलेले आहेत, त्यादृष्टीने या विभागाचे कामकाज अधिक प्रभावीपणे करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी श्री छगन भुजबळ यांच्याकडून मार्गदर्शनही घेतले असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी सुचवलेला शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम १००% यशस्वी करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या विभागाला सूचना
दरम्यान धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेला शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी करण्याच्या दृष्टीने व अधिक प्रभावी पद्धतीने कामकाज करण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा