विविध मागण्याकरिता किसान सभेचे धरणे २७ रोजी आंदोलन 

परळी / प्रतिनिधी...

अखिल भारतीय किसान सभेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सोमवार दि 27 रोजी धरणे आंदोलन होणार असून आपल्या मूलभूत प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमिटी कडून करण्यात आले आहे.


केंद्र सरकारने घोषित केलेला हमीभाव आणि राज्य कृषी मूल्य आयोगाने शिफारशीत केलेला भाव यातील तफावत राज्य सरकारने अनुदान देऊन भरून काढावी, सोयाबीन व कापूस खरेदी केंद्रावरील होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी व शेतकऱ्यांचा सर्व शेतीमाल हमीभावाने खरेदी करावा, खरीप हंगाम २०२४ चे आलेले अतिवृष्टी चे अनुदान पी एम किसान, कृषी विभागाचा डेटा वापरून डी बी टी द्वारे देण्यात यावे. अनुदान यादीत नाव घालण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. तसेच कापूस सोयाबीन भावंतर अनुदान व आत्ताचे अतिवृष्टी अनुदान मोबाईल आधार लिंक नसणे मोबाईल नसणे तसेच बोटांचे ठसे न लागणे या कारणांमुळे ज्यांच्या केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाहीत अशांची तोच व्यक्ती असल्याची खात्री करून त्यांना अनुदान देण्याची व्यवस्था करावी, सन २०२४ खरीप हंगाम अतिवृष्टीने बाधित झालेल्या शासकीय अनुदानाच्या धरतीवर सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्यांना वाटप करावा, विधानसभा निवडणुकीत वचन नाम्यात घोषणा केल्याप्रमाणे महायुतीने सर्व शेतकऱ्यांचे रुपये तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज या आर्थिक वर्ष अखेरपर्यंत माफ करावे व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, शक्तीपिठ महामार्ग रद्द करा या शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभा बीड कमिटी कडून आज सोमवार दि 27 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे

धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन किसान सभेकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !