बीडमधील गुन्हेगारांचे सिंडिकेट उद्ध्वस्त होणार ; आणखी एका प्रकरणात मकोकाची कारवाई
बीड : बीड मधील गुन्हेगारांचे सिंडिकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. सुदर्शन घुले गँगवर मकोकानुसार कारवाई केल्यानंतर आता महिनाभराच्या आतच आठवले गँगवर देखील अशाच पद्धतीने मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आठवले गँगमधील सहा जणांचा यात समावेश आहे.
अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद धीवर, ओंकार सवाई या सहा आरोपींचा समावेश यामध्ये आहे.. यातील सनी आठवले आणि आशिष आठवले हे फरार आहेत. बीडमधील या आठवले गॅंगवर गंभीर स्वरूपाचे १९ गुन्हे दाखल आहेत. संघटित गुन्हेगारीमध्ये खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार खंडणी, लुटमार, बनावट नोटा, मारहाण, असे गुन्हे आहे. आता बीड पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आता कारवाई करण्यात आली आहे. यापुढे देखील अशा पद्धतीने संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेतच यातून बीड पोलिसांनी दिले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा