केजमधील अपहरण झालेल्या 'त्या' अल्पवयीन मुलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका
केज :- केज तालुक्यातून अपहरण करण्यात आलेली ११ वर्षाची अल्पवयीन मुलगीची सुटका करण्यात आली असून आणि तिचे अपहरण करणाऱ्या अपहरण करणाऱ्या तरुणाला लातूर येथून ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, आई-वडील ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेले असताना ती अल्पवयीन मुलगी, तिची बहीण व भाऊ हे आज्जी सोबत जिवाचीवाडी येथे आजोळी राहत होती. सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली ११ वर्ष वयाची मुलगी ही केज येथील वसंत विद्यालयात शिकत आहे.
दि. ६ जानेवारी रोजी ती अल्पवयीन मुलगी ही शौचास गेली असता तिला टाकळी ता. केज येथील राजेश उत्तरेश्वर बारगजे याने मोटार सायकल वरून तिचे अपहरण केले होते.
अपहृत अल्पवयीन मुलीच्या आईने केज पोलिसात ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून त्याच्या विरुद्ध गु र नं. १०/२०२५ भा. न्या. सं. १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान दि. ८ जानेवारी रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे आणि त्यांच्या पथकाने लातूर येथून अपहृत मुलीची सुटका केली असून तिचे अपहरण करणारा राजेश उत्तरेश्वर बारगजे याला ताब्यात घेतले.
पोलीसांनी पाठलाग करताच मोटार सायकल सोडून मुलीला घेवून अपहरणकर्त्याचे पलायन
पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड, पोलीस जमादार राजू वंजारे, पोलीस नाईक शमीम पाशा यांनी आरोपींचा पाठलाग केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी कळंब तालुक्यातील परिसरात त्याची मोटार सायकल सोडून पळून गेला होता.
असा लागला अपहरणाचा तपास
राजेश उत्तरेश्वर बारगजे हा त्या अल्पवयीन मुलीला घेऊन रात्री लातूर येथील एका बिअर बार मध्ये गेला. तिला बळजबरीने मद्य पाजण्याचा प्रयत्न करीत असताना त्या मुलीने आरडाओरड केली. हे निदर्शनास येताच बार चालकाने लातूर येथील पोलिसांशी संपर्क साधला. त्या नंतर लातूर पोलिसांनी ती मुलगी व अपहरणकर्ता याला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली. त्या नंतर त्यांनीं केज पोलिसांशी संपर्क साधला. अशा रीतीने पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली आहे.
पोक्सो अंतर्गत होणार गुन्हा दाखल
या अपहरण प्रकरणी राजेश बारगजे यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आता त्याच्या विरुद्ध पोक्सो म्हणजे बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम नुसार देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.
-----------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा