# बीड जिल्हा बिहार नव्हे साहेब.....सद्गुणांची खाण !
परळी औष्णिक विद्युत केंद्राला आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार : "सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय जल कार्यक्षम युनिट" चा सन्मान
परळी औष्णिक विद्युत केंद्राला दि. 9 आणि 10 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित नॅशनल पॉवर-जनरल वॉटर समिटमध्ये पर्यावरण उत्कृष्टता परिषद आणि पुरस्काराने आयपीपी कोल 250-500 मेगावॅट श्रेणीतील "सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय जल कार्यक्षम युनिट" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे राज्यात अभिनंदन होत आहे. या परिषदेत परळी केंद्रातील कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ सतीश मुंडे उपस्थित होते. त्यांना CEA माजी अध्यक्ष पंकज बत्रा आणि भारत सरकारचे ऊर्जा मंत्रालय माजी सचिव अनिल राजदान यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.
परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनखानी कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ सतीश मुंडे आणि जलप्रक्रिय व पर्यावरण विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि कामगार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा