परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 चित्तथरारक सैनिकी देखावे व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वैद्यनाथ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

परळी वैजनाथ  दि.२८---

भारतीय सीमेवर दहशतवाद्यांशी निकराचा लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांचे चित्तथरारक युद्धकौशल्य, धावत्या दुचाकीवरील मनोवेधक स्वारी, महापुरुषांच्या वेशभूषेत संविधान रॅली, देशभक्तीपर गीतगायन, वस्त्राभूषण प्रदर्शनी इत्यादी कार्यक्रमानी दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या विविधांगी उपक्रमांद्वारे येथील वैद्यनाथ महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताकाचा ७६ वा वर्धापन दिन अतिशय उत्साह साजरा करण्यात आला.             ‌     ‌.                  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ए. आर. चव्हाण यांच्या हस्ते सकाळी ७.४० ध्वजारोहण झाले. त्यानंतर कॅप्टन जी. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना छात्रसैनिकांनी मानवंदना दिली. त्यानंतर शिवम राधाकृष्ण गित्ते, कु.प्रतीक्षा श्रीमंत रोडे, सुरज सुभाष बदने, रमेश लक्ष्मण मुळे यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध वातावरणात छात्रसैनिकांच्या दोन्ही तुकड्यांचे प्राचार्य निरीक्षण केले. 

      विशेष म्हणजे छात्रसैनिकांनी तितक्याच जोखमीत दुचाकीवरून काढलेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर बीसीए व सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने विविध महापुरुषांच्या वेशभूषेत त्यांच्या जीवन व कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी 

 भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधानाच्या कलमांचे बॅनर्स हातात घेऊन रॅलीच्या माध्यमाने संविधानाच्या मौलिक तत्वांचा संदेश देण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी देशभक्तीपर गीत सादर करून देशाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला.

             छात्रसैनिकांनी पाकिस्तानी दहशतवाद्याकडून घडवण्यात आलेला उरी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांनी घडवून आणलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा उत्कृष्ट देखावा सादर करून दर्शकांची मने जिंकली. यावेळी महाविद्यालयाचे दोन कर्मचारी श्री चेंडगे व श्री भोसले यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार देण्यात आला. तर बेस्ट कॅंडिडेट म्हणून  विष्णू ज्ञानोबा चंदेल व निखिल सुनील जाधव यांना जवाहर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. सदाशिवराव मुंडे व सचिव श्री दत्ताप्पा इतके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

     या ध्वजारोहण सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य व प्रा. दिलीप गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी , संचालक , निवृत्त प्राध्यापक,  कर्मचारी यांच्यासह उपप्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!