उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती
राजकिशोर मोदी ,अँड. विष्णुपंत सोळंके व श्री. प्रकाश सोळंकी यांच्याकडून अभिनंदन
परळी वैजनाथ/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेब यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालकराजकिशोर मोदी कॉटन फेडरेशन माजी उपाध्यक्ष अँड. विष्णुपंत सोळंके आणि अंबाजोगाई पिपल्स बँकेचे व्हा. चेअरमन श्री. प्रकाश सोळंकी यांनी मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. या भेटीवेळी अंबेजोगाई विकासा संदर्भात तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
मा ना अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाची निवड ही बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाची युवकांचे रोजगानिर्मिती ची संधी असल्याचे राजकिशोर मोदी अँड. विष्णुपंत सोळंके यांनी सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस ,, सोयाबीन चे हमी भावाने खरेदी मधील शेतकऱ्यांचे अडचणी सांगून त्या दुर करणे साठी दादांना विनंती केली शिक्षण, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यासंबंधी उपमुख्यमंत्र्यांकडे मागण्या मांडल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मार्केटिंग धोरणे, आणि शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर v ग्रामीण विकास कडे विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले.
राजकिशोर मोदी ,. अँड. विष्णुपंत सोळंके आणि प्रकाश सोळंकी यांनीही सतत प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांची नियुक्ती जिल्ह्यासाठी नवा आशावाद निर्माण करणारी असून, आगामी काळात जिल्ह्याच्या विकासासाठी ही जबाबदारी महत्वाची ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा