इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 डॉ.प्रशांत जाधव यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रमाने साजरा

पाटोदा/ अमोल जोशी......

      येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते एल.आर.जाधव यांचे चि.डॉ.प्रशांत जाधव(एमबीबीएस एमडी डीएनबी , पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिन, इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजिस्ट, फेलोशिप इन क्रिटिकल केअर) यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे विविध उपक्रमांने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. 

    पाटोदा येथील लक्ष्मीबाई कन्या प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक तथा पत्रकार विजय जोशी होते तर प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष राजुभैय्या जाधव, दै.चंपावतीपत्रचे विभागीय पत्रकार पोपट कोल्हे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एल.आर.जाधव,सुनिलदादा जाधव ,अतुल पारगावकर ,विजय जकाते हे होते.

  यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.अतुल पारगावकर,पत्रकार पोपट कोल्हे , जाधव एल.आर.,नगराध्यक्ष राजुभैय्या जाधव  यांनी मनोगत व्यक्त करून डॉ.प्रशांत जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विजय जोशी म्हणाले की डॉ.प्रशांत जाधव यांनी वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदीपक काम केले आहे.पाटोद्याचे भुमिपुत्र म्हणून त्यांनी कोरोना काळात  रूग्णांची सेवा केली ही बाब गौरवास्पद आहे.आजही ते रूग्ण सेवा  हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करीत आहे.डॉ.प्रशांत हे सामाजिक क्षेत्रातील कार्यात अग्रेसर आहेत.वैद्यकीय विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मागण्या मान्य करून घेतल्या आहेत.पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण द्यावे आपले मत त्यांच्यावर लादु नये असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमास सौ. ज्योती सवासे ,सौ.सीमा अनारसे ,सौ. शितल सावंत इ.उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक दादासाहेब घुमरे यांनी केले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!