वैद्यनाथ महाविद्यालयात गणित विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
वैद्यनाथ महाविद्यालयात गणित विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
येथील वैद्यनाथ महाविद्यालयात गणित विभागाच्या आर्यभट मॅथ क्लबच्या वतीने राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गणित दिन हा विद्यापीठाच्या परीक्षेच्या कालावधीत येत असल्याने तो आज साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. प्रमुख पाहुण्या म्हणून लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ए. आर. चव्हाण होत्या.कार्यक्रमाची सुरुवात गणित विभाग प्रमुख डॉ. बी. एस. सातपुते यांच्या प्रास्ताविकाने झाली. पाहुण्यांचा परिचय डॉ. बी. पी. गजभारे यांनी करून दिला. यावेळी आर्यभट मॅथ क्लबच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सेकंड इयरचे विद्यार्थी आशिष मुडे आणि किरण गुट्टे यांनी गणित तज्ञ श्रीनिवास रामाजुन व आर्यभट्ट यांच्या जीवन चरित त्रावर मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्या डॉ. विद्या देशपांडे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षा डॉ. ए. आर. चव्हाण यांनी आपल्या समारोपात गणित शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यभट मॅथ क्लबच्या विद्यार्थिनी शितल मुंडे व संध्या रोडे यांनी केले डॉ. बी. पी. गजभारे यांनी आभार मानले.या प्रसंगी उपप्राचार्य व्ही. बी. गायकवाड, प्रा. व्ही. व्ही. मुंडे, प्रा. समीर रेणुकदास, प्रा. गयानागाराव, प्रा. आर्या मॅडम, प्रा. सागर शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गणित विभागाचे कौतुक करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा