राष्ट्रीय सेवा योजना शिबिर: वसंतनगर येथे संविधान रॅली !
भारतीय संविधानचे आचरण हेच प्रत्येकचे कर्तव्य पाहिजे- प्राचार्या अर्चना चव्हाण
परळी - वैः - वसंतनगर येथे वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी युथ फॉर भारत ॲन्ड युथ फॉर डिजिटल लिटरसी ही संकल्पना घेऊन सात दिवशीय निवासी शिबीर उद्घाटन माझा भारत माझे संविधान माझे आचरण संविधान रॅली द्वारे प्राचार्या अर्चना चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण पवार , तर प्रमुख पाहुणे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला कॉलेजच्या प्राचार्या विद्या देशमुख , सरपंच विजय राठोड, उपसरपंच कुंडलीकराव जाधव ,प्रा. डॉ माधव रोडे, उपप्राचार्य प्रा. हरिश मुंडे, प्रा. डॉ. रमेश राठोड, प्रा. भिमानंद गजभारे , प्रा. डॉ. एम. जी. लांडगे अदि. उपस्थिती होते. यावेळी भारतीय संविधान आणि आपले कर्तव्य याविषयावर प्राचार्या अर्चना चव्हाण व्याख्यान दिले. त्याप्रसंगी त्या म्हणाल्या भारतीय संविधानने आपल्याला जीवन जगण्याचे मुलभुत अधिकार दिले. त्याच बरोबर आपल्या हक्कांची जाणीव करून दिली , स्वातंत्र्य, बंधुत्ता, न्याय ही तत्व आपण स्विकारली. सर्वच माणसाला जगण्याचा सन्मान डॉ. बाबासाहेबांनी मिळऊन दिला. शोषणाला विरोध करण्याचे शक्ती दिली. भारतीय संविधानाचे आचरण हेच आपले कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा असे मत प्राचार्या अर्चना चव्हाण यांनी व्यक्त केले. तर प्रमुख पाहुण्या प्राचार्या विद्या देशमुख म्हणाल्या आपण साक्षर झालोत आता भारतासाठी डिजीटल साक्षर होण्याची तयारी सुरू आहे. परंतु तत्रंज्ञान युगात समाज मध्यामावर व्यक्त होत असताना आपण सामाजिक बांधिलकीचे भान ठेवावे. अध्यक्षीय समारोप प्राचार्य अरुण पवार वेळी म्हणाले भारतीय संविधान आपल्या जीवन जगण्याची तत्व निमावली आहे एक सार्वजिनक एकात्मातचे प्रतिक आहे. त्याला जपने आपल्याच हाथ आहे. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ भिमानंद गजभारे यांनी व सुत्र संचलन प्रा प्रमोद गीत्ते आभार डॉ. श्रीहरी गुट्टे , प्रा. दिलीप गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन एन. एस. एस. विभागाच्या वतीने करण्यात आले. त्यात सागर जगताप , आरती शिंदे , शितल मुंडे , आफरिण पठाण , प्रणव आघाव , अभिजीत रोडे , संक्षम सरवदे , चैतन्य गीत्ते , अशिष मुंडे , किरण गुट्टे , करण गीत्ते, युवराज गीत्ते , शुंभिगी कंचनवाड , नम्रता सरवदे आदिनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा