ट्रॅक्टर आणि मोटार सायकलचा आपघात !
केज-अंबाजोगाई रस्त्यावर ढाकेफळ येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
केज :- केज तालुक्यातील ढाकेफळ येथे दिनांक १७ जानेवारी रोजी रात्री ९:३० वाजता ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात सुभाष रतन अंधारे वय (४० वर्ष) हा एकजण ठार झाला असल्याची माहिती मिळते आहे.
दि. १७ जानेवारी रोजी रात्री केज-अंबाजोगाई रोडवर ढाकेफळ जवळ सुभाष रतन अंधारे यांची मोटार सायकल ही एका ट्रॅक्टरला मागून धडकली. या अपघातात दुचाकी स्वार सुभाष रतन अंधारे वय (४९ वर्ष) याचा जागीच मृत्यू झाला आहे. सुभाष रतन अंधारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे ठेवण्यात आला असून या अपघाता संबंधी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा