आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्ताने ९ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई शहरात सहकार दिंडीचे आयोजन
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):- जागतिक युनो संघटनेने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन सहकार विभाग , असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फिडरेशन ऑफ क्रेडिट युनियन,महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन साईबाबाच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी येथे करण्यात आलेले आहे. या सहकार परिषदेचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री तथा केंद्रीय सहकार मंत्री मा. ना. अमित शहा यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार, मा.एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट चे अध्यक्ष सुरेश यांना वाबळे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त, केंद्रीय सहकार सचिव आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ४० देशाचे प्रतिनिधी या सहकार परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.
नियोजित सहकार परिषदेनिमित्त अंबाजोगाई शहरात नुकतीच एक बैठक संपन्न झाली. या बैठकीत अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहा निबंधक संतोष भंडारी यांची नुकतीच पदोन्नती होऊन ते सहकार अधिकारी श्रेणी A ग्रेड पदी नियुक्त झाल्याबद्दल त्यांचा शाल , पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या सहकार परिषदेचा प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व सहकार खात्याच्या वतीने राज्यातील सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहकार दिंडीचे दि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी अंबाजोगाई शहरात आगमन होणार आहे. ही सहकार दिंडी अंबाजोगाई शहरातून धाराशिव कडे मार्गक्रमण करणार आहे. या सहकार दिंडीच्या स्वागतासाठी अंबाजोगाई, परळी, केज आणि धारूर तालुक्याच्या वतीने जिल्हा उपनिबंधक , सहाय्यक निबंधक सहकार अधिकारी आणि सर्व सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष संचालक व कर्मचारी तसेच नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, संचालक व कर्मचारी, नागरी व मल्टीस्टेट पतसंस्थांचे अध्यक्ष, कर्मचारी आणि संचालक मंडळ तसेच सेवा सहकारी सोसायटीचे सचिव आणि मार्केट कमिटीचे सर्व संचालक व कर्मचारी यांच्या वतीने देखील सहकार दिंडी काढून या दिंडीचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती बीड जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष कचरू लालजी सारडा तसेच सहकार अधिकारी संतोष भंडारी यांनी दिली आहे.
सहकार परिषदे निमित्त अंबाजोगाई शहरात येणाऱ्या सहकार दिंडीच्या स्वागतासाठी नुकतीच एक बैठक संपन्न झाली. दिंडीच्या स्वागत बैठकीसाठी आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष ऍड सुनील सौंदरमल, संध्या मल्टीस्टेटचे अध्यक्ष जगताप साहेब, एसएनएस पतसंस्थेचे अध्यक्ष नाथराव रेड्डी, राजर्षी शाहू पतसंस्थेचे अध्यक्ष राजू मोरे, आधारचे संचालक प्रा. डी.जी धाकडे, डॉ. कमलाकर कांबळे, येडेश्वरी पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद येडे त्याचबरोबर अंबाजोगाई शहरातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष संचालकांसह अनेक संस्थांचे व्यवस्थापक मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा