15 वर्षापासून घेतली जाते परिक्षा..

वसंतराव नाईक विद्यालय आयोजित PTNTS परीक्षा उत्साहात 

तालुक्यातील तब्बल 1800 विद्यार्थ्यांचा सहभाग : 15 वर्षापासून घेतली जाते परिक्षा

पाटोदा /अमोल जोशी....    

      शहरातील नामांकित असलेल्या वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित पाटोदा तालुका नवानिर्माण प्रज्ञाशोध PTNTS परीक्षेचा उद्घाटन सोहळा शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .

  गत पंधरा वर्षापासून पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन वसंतराव नाईक विद्यालयात केले जात आहे आज झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपशिक्षणाधिकारी रत्नाकर जायभाय हे होते तर प्रमुख पाहुणे नगरसेवक नय्युम पठाण ,नगरसेवक महादेव जाधव पत्रकार इद्रीस चाऊस पत्रकार महेश बेंद्रे, हमीद  पठाण, विजय जाधव ,शेख जावेद  , सचिन गायकवाड,पाटोदा शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख श्रीहरी येवले शहरातील शिक्षण प्रेमी नागरिक सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षेचे भीती नाहीशी होऊन स्पर्धा परीक्षेला सक्षमपनाने सामोरे जाण्यासाठी व भविष्यात यशस्वी होण्यासाठी इयत्ता तिसरी ते दहावी या गटामध्ये विद्यालयामार्फत पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने विद्यालयात केले जात आहे या स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये धैर्य निर्माण होण्यासाठी व त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकारातून प्रथम द्वितीय व तृतीय व उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव प्रायोजक यश कॉम्प्युटरचे संचालक बाळासाहेब मंडलिक शहीद जवान अजित वालेकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुजित वालेकर ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे संचालक प्रमोद गर्जे ग्रामविकास फाउंडेशन येवलवाडी ना चे अध्यक्ष मधुकर नागरगोजे व शरद नागरगोजे कै. जगन्नाथराव सानप यांच्या स्मरणार्थ प्रा. प्रदीप सानप, कै. सिंधुबाई सुमंतराव नंद यांच्या स्मरणार्थ प्रा. सुधीर नंद यांच्यावतीने रोख बक्षीस स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मान केला जातो. यावर्षी देखील या परीक्षेसाठी पाटोदा तालुक्यातून सुमारे 1733 विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर परीक्षा दिली. या परीक्षा उद्घाटन कार्यक्रमास पाटोदा शहरातील प्रा रवींद्र दुरंदे , प्रा राजेंद्र आवळे प्रा. खोसे प्रा. निर्मळ प्रा.पवार नवनाथ राख आप्पासाहेब घुमरे, माजी मुख्याध्यापक सेनापती जायभाय, बाबासाहेब बामदळे, विष्णू चेपटे, माजी पर्यवेक्षक आप्पाराव सानप सुनील मस्कर प्राध्यापक पंडित जायभाय सद्गुरु गर्जे सह मुख्याध्यापक नईम पठाण, सुवर्णा भोपळे, मोरे सर,सोईस्कर सर, नागरगोजे सर सह असंख्य पालक शिक्षक पालक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या सर्वांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक तथा प्राचार्य तुकाराम तुपे पर्यवेक्षक संजय राख, शेख गणी ज्ञानदेव खेडकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परीक्षा विभाग प्रमुख एम आर नागरगोजे यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार