इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन

परळी (प्रतिनिधी)

           दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत गजानन महाराज विश्वस्त मंडळ विद्यानगर परळी च्या वतीने १८ ते 20 फेब्रुवारी दरम्यान  चरित्र पारायण सोहळा व हरिनाम सकिर्तनाचा  त्रिदिवसीय कार्यक्रम होणार आहे.

          दैनिक धार्मिक कार्यक्रमा मधे पहाटे 4 ते 6 काकडा आरती,7 ते 10 चरित्र पारायन,10 ते 12 महिला भजनी मंडळ यांचे भजन, तर रात्री 8 ते 11 या वेळेत कीर्तन होणार आहे. दि. १८ फेब्रु. रोजी श्री ची पुजा,अभिषेक व नंतर 10 ते 12 या वेळेत राधाकृष्ण महिला भजनी मंडळ यांचे भजन,तर रात्री 8 ते 11 या वेळेत ह.भ.प. श्री श्रीहरी महाराज पुरी आष्टी यांचे कीर्तन होणार आहे. १९ फेबु . रोजी गजानन महाराज महिला मंडळ यांचे भजन,तर रात्री ह.भ.प. गोविंद महाराज मुंडे यांचे कीर्तन होणार आहे. 20 फेबुवारी रोजी सोहळा सांगता दिनी सकाळी 8 ते 10 श्री ची पालखी मिरवणूक, तर सकाळी 10 ते 1 या वेळेत ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

          मागील 22 वर्षापासून या धार्मिक सोहळ्याची अखंड परंपरा  सुरु असुन विश्वस्त मंडळ यांच्या अथक परिश्रमा तून याठिकाणी धार्मिक कार्यक्रमासह विविध समाजोपयोगी उपक्रमही घेण्यात येतात. यामधे रक्तदान,परिसर स्वच्छता,दर गुरुवारी भजन यांचा समावेश असतो. मंदीर स्थापनेपासुन दर गुरुवारी श्री ना पिठल भाकरी चा नैवेद्य, हरीपाठ, आरती,पुजा असे कार्यक्रम घेण्यात येतात. विश्वस्त मंडळासह परिसरातील भाविक भक्त आदींचा यात हिरिरीने सहभाग असतो. प्रगट दिन सोहळ्या निमीत्त सलग तिन दिवस या ठिकानी यात्रेचे स्वरुप पहावयास मिळते. याही वर्षी १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या भरगच्च  धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


* हरिनाम संकीतर्नाचा त्रिदिवसीय कार्यक्रम

* मागील 22 वर्षांची अखंडीत परंपरा

* धार्मिक कार्यक्रमांसह विविध समाजोपयोगी उपक्रम

* परळीसह पंचक्रोशीतून भाविकांची अलोट गर्दी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!