नारायण भागुजी अमृत यांचे निधन
परळी वैजनाथ / प्रतिनिधी
परळी वैजनाथ येथील रहिवासी नारायण भागुजी अमृत यांचे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 80 वर्षांचे होते.
रामदेवबाबा मंदिर, डांगे गल्ली भागातील रहिवासी असलेले नारायण भागुजी अमृत हे मनमिळाऊ आणि सुस्वभावी होते. सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असे. त्यांच्या निधनाने समाजाने एक आदरणीय व्यक्ती गमावली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्यसंस्काराची विधी आज दुपारी 12 वाजता परळी वैजनाथ मोक्षधाम येथे पार पडली. राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या सकाळी 8:30 वाजता परळी वैजनाथ मोक्षधाम येथे होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा