आजपासून परळीत दासनवमी उत्सव

दासबोध पारायणात सहभागी होण्याचे रामदासी परिवाराचे आवाहन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येत्या शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी "दासनवमी" असून या निमित्त शहरात दास न उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दासनवमी निमित्त होणार्‍या दासबोध पारायण यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रामदासी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.    

      परळी शहरातील नामांकित श्री संस्थान श्री गोराराम मंदिर, गणेशपार येथे उद्या गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी ते शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सकाळी 11 ते दुपारी दोन या वेळेमध्ये दासबोध ग्रंथाचे पारायण केले जाणार आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संस्थान गोराराम मंदिर येथे दास नवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये दासबोधाच्या पारायण दासनवमी उत्सवामध्ये सर्व समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सौ. उषा रामदासी, सौ. उर्मिला रामदासी, श्रीमती रत्ना रामदासी, सौ. वनिता रामदासी, सौ. शुभांगी रामदासी, सौ. सारिका रामदासी, सौ. सुनिता रामदासी यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !