श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त परळीत  श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पासून परळी मध्ये श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण माझे आयोजन करण्यात आले आहे. या भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

     श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची येत्या 15 फेब्रुवारी रोजी 739 वी पुण्यतिथी असून यानिमित्त परळीमध्ये श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण याचे आयोजन करण्यात आले असून या कथेला उद्या शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणार आहे. भागवताचार्य ह. भ. प. जनाई महाराज कोकाटे यांच्या मुखातून भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ भाविकांना मिळणार आहे. उद्या शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी ते दिनांक 14 फेब्रुवारी पर्यंत ही भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण होणार असून ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख म्हणून ह. भ. प. लक्ष्मीबाई चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.

   दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते 11 या वेळामध्ये ह. भ. प. जनाई महाराज कोकाटे यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दररोज सकाळी 8 ते 12 या वेळामध्ये ज्ञानेश्वरी पारायण होणार असून दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये श्रीमद् भागवत कथा होणार आहे. शहरातील श्री संत नरहरी महाराज मंदिरामध्ये होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमास  भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सुरेश अण्णा टाक अध्यक्ष सुवर्णकार समाज व श्री राहुल शेठ टाक अध्यक्ष सराव असोसिएशन परळी वैजनाथ संयोजन समितीचे अध्यक्ष संजय बुरांडे, सचिव विजय दहिवाळ, कार्याध्यक्ष संतोष टाक यांच्यासह संपूर्ण सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार