अर्थसंकल्पात नेमकं काय काय....?

 काय स्वस्त, काय महाग? मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं?


    अर्थमंत्री म्हणून मंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अनेक गोष्टी स्वस्त करण्यात आल्याच्या घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केल्या.

        केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त होतील. तसंच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. मुख्यत्वे कॅन्सर, ईव्ही या गोष्टींवरील कर कमी करण्यात आला आहे.
काय स्वस्त? काय महागणार?
       चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार. इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील.मोबाईल फोन आणि मोबाईलच्या बॅटरी स्वस्त होतील.इलेक्ट्रिक कार स्वस्त होईल.कपड्याच्या वस्तू स्वस्त होतील.एलईडी टीव्हीही स्वस्त होईल.कर्करोगावरील तब्बल ३६ औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत. तर अनेक औषधांवरून कस्टम ड्युटी हटवली जाईल.फ्रोझन फिश पेस्टवरील कस्टम ड्युटी १५ वरून ५ विणकरांनी विणलेले कपडे स्वस्त होतील. सागरी उत्पादनांवरील कस्टम ड्युटी ३० वरून ५ टक्के करण्यात आली.
कोबाल्ट, लिथियम, आयन बॅटरी कचरा आणि जस्त वरील प्राथमिक आयात शुल्क काढून टाकण्यात आले आहे.स्मार्टफोन आणि स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली. यामुळे देशातील स्मार्ट एलईडी टीव्ही आणि स्मार्टफोनच्या एकूण किमती कमी होतील.कॅरिअर ग्रेड इथरनेट स्विचेस स्वस्त होणार आहेत.पुढील १० वर्षांसाठी जहाजे बांधण्यासाठी कच्च्या मालावरील मूलभूत सीमाशुल्कातून सूट.

काय महागलं?
फ्लॅट पॅनेल डिस्प्ले महाग होणार आहेत.सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा स्मार्टफोन्स निर्मितीसाठी लागणारे घटक स्वस्त झाले आहेत. त्यामुळे भारतात तयार होणाऱ्या या वस्तू स्वस्त होतील. याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. म्हणजे आता भारतात तयार होणार आयफोन स्वस्त होऊ शकतो.
          केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज सादर झाला असुन  मोदी सरकारचा सर्वांना सुखावह व सर्वंकष हिताचा हा अर्थसंकल्प आहे."सर्वे भवन्तु सुखिन " हे सुत्र या अर्थसंकल्पांचे दिसुन येत असुन शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना अधिक समृद्ध करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
     अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी  सर्व क्षेत्रातील व सर्व  घटकांसाठी सुखावह अनेक मोठ्या घोषणा यावेळी केल्या आहेत. शेतकऱ्यांना अधिक सुखी,समाधानी व समृद्ध करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने या अर्थसंकल्पातून केला आहे. यासोबतच अनेक गोष्टी स्वस्त करण्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. भारतात तयार होणारे कपडे आता स्वस्त होणार आहेत. यासोबतच मोबाईल फोनही स्वस्त दरात मिळणार आहेत. चामड्यांच्या वस्तू स्वस्त होणार, इलेक्ट्रॉनिक वाहन स्वस्त होणार, टीव्ही स्वस्त होणार, वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार आहेत. मरीन प्रॉडक्टवरील ड्युटी हटवली आहे. टीव्हीचे देशांअंतर्गत पार्टस स्वस्त होणार, ईव्हीचे इंजिन बनवण्यासाठी आवश्यक माल स्वस्त होणार आहे. यासोबतच बूट, लेदर जॅकेट, बेल्ट, पर्स स्वस्त होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

निर्णय मोदी सरकारचा, शेतकऱ्यांच्या हिताचा! 
-----------------------------
  शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा करण्यात आली आहे.सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे. १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. याचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा होणार आहे.भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी राज्यांसोबत योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.शेतकऱ्यांवरील रासायनिक खतांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे. या अंतर्गत आसाममध्ये युरियाचा नवा प्लांट सुरू होणार आहे.कापूस उत्पादन वाढवण्यासाठी ५ वर्षाचे मिशन आखण्यात आले आहे. यामुळे देशातील कापड व्यवसाय मजबूत होईल. यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांचे पॅकेजही दिले जाणार आहे.किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा आता ₹3 लाखांवरून ₹5 लाख करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड द्वारे 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना सुलभ कर्ज सुविधा मिळणार आहे.

सामान्य माणसाची खर्च करण्याची क्षमता वाढेल
----------------------------
अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे. त्याचसोबत पुढील सर्व टॅक्स स्लॅब्जमध्येही  बदल केले असून त्यानुसार करदात्यांना भराव्या लागणाऱ्या करात सूट मिळाली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी हा अर्थसंकल्प मोठा दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाची खर्च करण्याची क्षमता वाढेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढवणे, सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करताना खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे, देशांतर्गत भावना उंचावणे आणि वाढत्या मध्यमवर्गाची खर्च क्षमता वाढवणे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार