बॅक कॉलनी भागातील सोमेश्वर सृष्टीत घरफोडी ; १लाख ४८ हजारांचा ऐवज लंपास

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
    परळी शहर  व तालुक्यात चोऱ्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. शक्तीकुंज वसाहतीत घरफोड्यांचे सत्र सुरूच असतांना बॅक कॉलनी भागातील सोमेश्वर सृष्टीत घरफोडीची घटना घडली आहे. या घटनेत १लाख ४८ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि २३.०१.२०२४ रोजी ते दि ०१/०२/२०२५ रोजीचे दरम्यान शंकर जगन्नाथ गर्जे वय ४९ वर्षे व्यवसाय व्यपार रा. सोमेश्वर सृष्टी, बॅक कॉलनी परळी वै यांचे राहते घराचे दरवाज्याचे कडी कोंडा व कुलुप तोडुन प्रवेश करून अज्ञात चोरांनी चोरी केली. यामध्ये १)१५,००० रू कि चे एक ०५ ग्रॅम वजनाचे जुनी वापरती सोन्याची ठुशी जु.वा २) ३०,०००रू चे कि चे एक १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मेगळसुत्र जु वा ३) १५,००० रू कि चे ०५ ग्रॅम वजनाचे व मंगळसुत्र जु वा अं कि ४) ३,००० रु कि चे दोन चांदीचे जोड प्रत्येकी ०५ ग्रॅम जु वा कि अं ५)८५,००० रू रोख रक्कम त्यामध्ये ५०० रू व १०० रू चलनी नोटा असे नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असा १,४८,००० रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला. 
      याप्रकरणी  शहर पोलीस ठाण्यात गुरनं २१/२०२५ कलम ३०३(२),३३१ (४) ,३०५ (ए) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !