इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्या डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाई ची मागणी

अंबाजोगाई :-(वसुदेव शिंदे);-

अनेक वर्षापासून अंबाजोगाई शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची पत्रकार भवन व्हावे सातत्याने मागणी होत असताना अद्याप लोकप्रतिनिधी यांच्याकडून पत्रकार भवना च्या मागणीची दखल घेण्यात आली नाही परंतु अंबाजोगाई चे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्या पुढाकाराने पत्रकारांसाठी नगरपरिषद येथे तात्पुरता स्वरूपात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय शेजारी पत्रकार कक्ष तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे परंतु ज्या ठिकाणी पत्रकार पक्ष देण्यात आला ती इमारत जुनी आहे कोणत्याही क्षणी ती इमारत जमीनोदोस्त केली जाणार आहे त्यामुळे अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीस माजी पालकमंत्री व कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी पुढाकार घेऊन पाच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे या जागेमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे त्यामध्ये अंबाजोगाई पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाई तालुक्याच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई चे सभापती व सचिव यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात  आली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!