यंदा दरवर्षीपेक्षा जास्त गर्दी !

ओम नम: शिवायच्या जयघोषात वैद्यनाथनगरी दुमदुमली : महाशिवरात्र पर्वकाळात वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी

परळी वैजनाथ,प्रतिनिधी:

       येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची काल (२५)मध्यरात्रीपासूनच विक्रमी गर्दी पहायला मिळाली.हर हर महादेव! प्रभू वैद्यनाथ महाराज की जय! अशा जयघोषाने वैद्यनाथ मंदिर परिसर दुमदुमून गेला. देशाच्या कानाकोपऱ्यातून व  महाराष्ट्र राज्य, परराज्यासह ग्रामीण भागातील भाविकांनी महाशिवरात्रीला दर्शनाचा लाभ घेतला. मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत सुमारे पाच लाखाच्यावर भाविकांनी वैद्यनाथप्रभुंचे दर्शन घेतले. महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान व पोलीस प्रशासनाने नेहमीप्रमाणेच अत्यंत चांगली सुविधा देण्यासोबतच पोलीसांनी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

       महाशिवराञीच्या महापर्व काळात लाखो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा,गुजरात, मध्य प्रदेश येथील  भाविक परळीत मोठ्या प्रमाणात दाखल झाले. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शानासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. महाशिवरात्र उत्सवामुळे परळी शहर गजबजले आहे. वैद्यनाथ मंदीरात काल रात्री 12 वा. पासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली.

         महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी महिला व पुरुष अशा दोन वेगळ्या रांगा तसेच पास धारकांची स्वतंत्र रांग  अशी दर्शनव्यवस्था करण्यात आली. ही रांग वैद्यनाथ मंदिर पासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत गेली होती. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने श्री वैद्यनाथ मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली. रंगरंगोटी करण्यात आली आहे. आकर्षक पुष्प सजावट करण्यात आलेली आहे.पायऱ्यावर बॅरिकेटची सोय करण्यात येऊन मंडप उभारण्यात आला आहे. 

          दरम्यान, हर हर महादेव चा जयघोष करीत काल मध्यरात्री पासून आज  जवळपास 5 लाखांच्यावर भाविकांनी श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले अशी माहिती श्री वैजनाथ मंदिराचे सचिव प्रा.बाबासाहेब  देशमुख यांनी दिली.  मंत्री धनंजय मुंडे यांनीही काल रात्री दर्शन घेतले.

महाशिवरात्रीच्या दिनी आज  (दि.२६) रोजी भविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी मोठी रिघ लावली आहे. राज्यासह सीमावर्ती भागातील शेकडो भाविक  परळी शहरात दाखल झाले आहेत. परळी नगरीत येणाऱ्या भाविकांच्या सेवेकरिता शहरातील अनेक सामाजिक संघटना यांनी उपवासाच्या फराळाची, पिण्याच्या पाण्याची जागोजागी मोफत सोय उपलब्ध केली. मंदिर परिसरात जागोजागी भाविकंाचे जथ्थे दिसत असतांनाच रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी सामाजिक व राजकीय संस्थांनी भाविकांसाठी मोफत पाणी व खिचडी वाटपाचे स्टॉल ठेवले होते. 









आणखी वाचा: > Mahashivratri 2025 : १२ ज्योतिर्लिंगमधील पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, जाणून घ्या त्याचे धार्मिक महत्त्व ■ *केवळ स्पर्शदर्शनाने होते आरोग्यदायी फलश्रुती: अमृत व धन्वंतरी एकरुप असलेले एकमेव ज्योतिर्लिंग श्री.वैद्यनाथ* > भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर यांचा विशेष लेख >>>>


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार