सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणार पुरस्कार - जनक उबाळे
सिरसाळा भूषण पुरस्कार २०२५" साठी १०मार्च पर्यंत प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-
सिरसाळा येथील जनकल्याण शैक्षणिक सेवाभावी संस्था व यशराज पब्लिक स्कुलच्या वतीने २२ मार्च २०२५ रोजी "सिरसाळा भूषण पुरस्कार २०२५" देण्यात येणार असून या पुरस्कारासाठी १० मार्च २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन श्री. जनक साहेबराव उबाळे अध्यक्ष, जनकल्याण बुउद्देशिय सेवाभावी संस्था वाघाळा यांनी केले आहे.
सिरसाळा व पंचक्रोशी मधे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निस्वार्थी भरीवपणें कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन मागील काही वर्षा पासून जनकल्याण बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था वाघाळा व यशराज पब्लिक स्कुलच्या वतीने सामाजिक /शैक्षणिक /सांस्कृतिक /सेवा /आरोग्य सेवा /राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस "सिरसाळा भूषण पुरस्कार" देण्यात येत असून या वर्षी देण्यात येणाऱ्या "सिरसाळा भूषण पुरस्कार २०२५" साठी संस्थेच्या वतीने प्रवेशिका मागवण्यात येत आसून सामाजिक /शैक्षणिक /सांस्कृतिक /सेवा /आरोग्य सेवा /राजकीय /पत्रकारिता /कृषी/क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना २२ मार्च २०२५ रोजी "सिरसाळा भूषण पुरस्कार २०२५" ने सन्मानित करण्यात येणार असून या पुरस्कारासाठी १० मार्च २०२५ पर्यंत
आपल्या प्रवेशिका यशराज पब्लिक स्कूल सिरसाळा या पत्त्यावर पाठवाव्या असे आवाहन श्री. जनक साहेबराव उबाळे अध्यक्ष जनकल्याण बुउद्देशिय सेवाभावी संस्था वाघाळा व अध्यक्ष सिरसाळा भूषण पुरस्कार २०२५ निवड समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा