वाढदिवस संकल्प....
जनतेच्या प्रेमाने प्रेरित होऊन समाजासाठी अहोरात्र कार्यरत राहणार - प्रा.अतुल दुबे
प्रभू वैद्यनाथास अभिषेक, महाप्रसाद वितरण, सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन
परळी (प्रतिनिधी)
परळी शहर आणि परिसरातील नागरिकांचे माझ्यावर मनापासून प्रेम आहे. मी नेहमीच समाजासाठी जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून समाजसेवेसाठी मी सदैव तत्पर राहणार आहे, असे प्रतिपादन जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अतुल दुबे यांनी केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. अतुल दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी सकाळी पंचमज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथ मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मंदिरासमोर गोरगरीबांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
मित्रमंडळातर्फे सत्कार समारंभ
यावेळी प्रा. दुबे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मित्रमंडळ, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना प्रा. दुबे म्हणाले, परळी शहर आणि परिसरातील जनतेच्या प्रेमाची शिदोरी मला मोठ्या कार्याची प्रेरणा देते. समाजासाठी जे शक्य आहे ते करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत आलो आहे. आपल्या प्रेमामुळेच मी आज या ठिकाणी आहे. यापुढेही अधिक जोमाने समाजसेवेसाठी कार्यरत राहीन, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
समाजहिताच्या कार्याचे सर्वत्र कौतुक
प्रा. अतुल दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांचे आणि सेवाभावी वृत्तीचे संपूर्ण शहरभर कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिष जोशी, सचिन लोढा, बबन ढेंबरे, माऊली मुंडे, सुरेश परदेशी, मोहन परदेशी, गणेश जठार, सिद्धार्थ गायकवाड, कृष्णा बेदरकर, नवनाथ वरवटकर, बालाजी सातपुते, आकाश जाधव, गणेश काकडे, राहुल फुले, लक्ष्मण मुंडे यांच्यासह जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य, पदाधिकारी, मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा