इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन    

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)...समस्त ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.


 समस्त ब्राम्हण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यलय अंबाजोगाई येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनाचे वाचन शैलेश कुलकर्णी यांनी केले या वेळी संजय देशपांडे, अनिरुध्द चौसळकर,पडमनाभ देशपांडे, अभय जोशी,डॉ दिलीप कुलकर्णी, भास्कर देशपांडे,मिलिंद कुलकर्णी, विवेक वालेकर, ॲड स्वानंद कन्नडकर,सुभाष देशपांडे आणि मोठ्या प्रमाणात समस्त ब्रह्मवृंद उपस्थित होते.

मागण्या   परशूराम महामंडळासाठी पाचशे कोटींची तरतूद करणे.   प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन नावाने ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधून देने.  ब्राह्मण समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षण मोफत करावे .  श्रीवर्धन येथील श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे स्मारकाचे नुतनीकरण करणे.  सिबीएससी स्टेट बोर्ड यांच्या पुस्तकात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर आधारित धडा समाविष्ठ करणे.

   पुरोहित व पुजारी याना मासिक दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे.  स्वातंत्र्यवीर सावकार याना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा . शनिवारवाडा येथील दर्गा तात्काळ काढून वाड्याची डागडुजी करण्यात यावी.चिपळुण येथील भगवान परशुराम मंदिराला विशेष धार्मिक स्थळाचा दर्जा द्यावा.ब्राम्हण समाजातील शेतकऱ्यांना शेतीसाठी अवजारे, ट्रॅक्टर साठी अनुदान देण्यात यावे.ब्राम्हण समाजाच्या कुळात गेलेल्या जमीनी परत कराव्यात..या वरिल सर्व मागण्यांच्या संदर्भात मार्चमध्ये येणाऱ्या बजेटमध्ये निर्णय घ्यावा अशी विनंती सह निवेदन देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!