आ. सुरेश धस यांनी केज पोलीस ठाण्यात !
संतोष देशमुख हत्या प्रकणातील संशयित पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची केली मागणी
केज :- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित पोलीस अधिकाऱ्यांना आरोपी करण्याची मागणी ही गावकरी आणि नागरिकांची असल्याची मागणी आ. सुरेश धस यांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध राज्यात आक्रमकपणे रान उठवून त्यांच्या चौकशीची मागणी करणारे आ. सुरेश धस यांनी त्यांची अचानक भेट घेतली. त्या नंतर राज्यात चर्चेची राळ उडाली. त्या सर्व चर्चेच्या पार्श्वभूमीवर आ. सुरेश धस यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेवून मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध अधिक आक्रमक होत त्यांच्या कृषी मंत्री व जिल्ह्याचे तत्कालीन पालक मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
दि. २२ फेब्रुवारी रोजी आ. सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्या नंतर केज येथील पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी प्रभारी पोलीस पोलीस अधिकारी वैभव पाटील यांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांनी अशी मागणी केली की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींशी संपर्क असलेले संशयित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणी या दोन पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा. अशी नागरिकांनी मागणी आहे. अशी त्यांनी मागणी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा