परळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक;उपस्थित राहण्याचे आवाहन
परळी प्रतिनिधी......
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीची आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी नूतन शाखा कार्यकारणी निवडीच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती परळी शाखेची कार्यकारणी निवडीची बैठक सायंकाळी 4 वाजता जिजामाता उद्यान येथे ठेवण्यात आली आहे .या बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 2025 या वर्षांकरिता नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे.तरी या बैठकीस अंनिस पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक, विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा