शिवजयंती निमित्त गीता परिवार परळी वै. द्वारा आयोजित प्रश्नावली स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
परळी वैजनाथ,प्रतिनिधी...
शिवजयंती निमित्त गीता परिवार परळी वै. द्वारा आयोजित प्रश्नावली स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत केवळ दोन शाळांमधील तब्बल २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गीता परिवार परळी वैजनाथ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नावली स्पर्धेत विद्यावर्धिनी विद्यालयातील 150 आणि महर्षी कणाद विद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या आयोजनासाठी विद्यावर्धिनी शाळेच्या मुख्याध्यापक सुमठाणे सर आणि महर्षी कणाद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका त्रिवेणी भांगे मॅडमचे अनमोल सहकार्य लाभले.गीता परिवा च्या ललिता जाजू यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यकारिणी आणि सदस्यांच्या मेहनतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा