ताल मार्तंड प्रकाश बोरगांवकर यांची पर्यावरण दूत " म्हणून निवड
अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे)...
तालमार्तंड श्री प्रकाशजी बोरगावकर यांची पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली.
राज्य शासनाद्वारे पृथ्वी,जल,तेज,वायू आणि आकाश यावर आधारित पर्यावरण संरक्षण करीत 'माझी वसुंधरा अभियान ५.० ची सुरवात केलेली असून श्री प्रकाशजी बोरगावकर हे स्वतः, परिवारातील सदस्य,मित्र,नातेवाईक यांना सोबत घेऊन स्वच्छतेसोबतच निसर्ग बचाव,पर्यावरण, वृक्षारोपण असे अनेक असामान्य कार्य करतात.
त्यांच्या विविध घटकातील सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व स्वच्छते आणि स्वयं मदतीने केलेल्या अतुलनीय कार्याची व्याप्ती पाहता माझी वसुंधरा अभियान ५.० अंतंर्गत अंबाजोगाई शहरातील नागरिकांमध्ये व्यापक व्यक्तिगत स्वछता, नदी स्वछता,श्रमदान कचरा विलीगिकरण घरोघरी ओल्या कचऱ्यापासून कम्पोस्ट खत बनवणे,वृक्ष लागवड व संगोपन,नवी करनिय ऊर्जा स्तोत्रांचा वापर करणे, पाण्याची बचत,पर्यावरण संतुलन व संवर्धन आदी बाबत जनजागृती करिता अंबाजोगाई नगरपरिषद मार्फत "पर्यावरण दूत"म्हणून निवड करण्यात आली आहे
त्यांची कार्यक्षता आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव म्हणून ही निवड करण्यात असली आहे. त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक आणि सर्वत्र शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा