गाढे पिंपळगाव येथील बहीण- भाऊ एकाचवेळी महसूल सहाय्यक 

परळी वैजनाथ दि.१५ (प्रतिनिधी)

         तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील शेतकरी, शेतमजूराची मुले महसूल सहाय्यक म्हणून नुकतीच निवड झाली. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

             गाढे पिंपळगाव येथील शेतकरी, शेतमजूर असलेले बालासाहेब भोसले यांना चार अपत्य असून दोन मुले निलेश व दोन मुली अश्विनी व निशा आहेत. बालासाहेब भोसले यांना दोन एकर शेती असून आपली शेती करत बालासाहेब व पत्नी संजिवनी दोघेही शेत मजूरी करत आपल्या मुलांना शिक्षण दिले. घरात काही कमी जास्त असले तरी मुलांना शिकवण्याचा ध्यास घेतला. चार जणांच्या शिक्षणाचा खर्च करणे जिकरीचे होत असतानाच मोठ्या मुलीचे अश्विनीचे लग्न करावे लागले. पण पुढील अपत्यांना शिक्षणासाठी कोणताही खर्च कमी पडू दिला नाही.आपल्या वडील़ाचे कष्ट पाहत मुलांनीही मेहनतीने शिक्षण घेतले.यामुळे परवा लागलेल्या महसूल सहाय्यक पदाच्या निकालात निलेश व निशा एकाचवेळी उत्तीर्ण होवून लवकरच त्यांना पदे मिळणार आहेत. निलेश व निशा दोघांचेही प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक विवेकानंद विद्यालय, निशाचे उच्च माध्यमिक लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पूर्ण झाले. तळ निलेशने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठातून पूर्ण केले.निलेश, निशा, महेश यांना स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी बालासाहेब यांनी त्यांच्या आग्रहास्तव शिक्षणाचा खर्च झेपत नसताना लातूरला ठेवले. बेसीक कोर्स करून सेल्फस्टडी सुरू केली. निलेशने राज्य सेवा परिक्षेची पात्रता परिक्षा आता पर्यंत सहावेळा पास झाला आहे. तर चार मुख्य परिक्षेत एकते दोन मार्क्सने त्याला अपयश आले. आता आणखी दोन मुख्य परिक्षा एक ते दोन महिन्यात देणार आहे. पण निशाने पहिल्याच प्रयत्नात महसूल सहाय्यक पदासाठी यश प्राप्त केले.याबद्दल बहिण-भावाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-------------------------------------------------------

 निलेश भोसले दिव्यांग....

   निलेश बालासाहेब भोसलेला दृष्टी कमी आहे. दोन्ही डोळ्याने अत्यंत कमी दिसते. डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी एकही पुस्तक वाचू नको, अभ्यास केलास तर आहे ती दृष्टी  जाईल असे सांगितले असतानाही निलेशने अभ्यास काही बंद केला नाही. निलेश दोन महिन्यांत दोन मुख्य परिक्षा देणार असून सध्या तलाठी व ग्रामसेवक पदासाठी तो पास असून वेटिंग लिस्ट मध्ये आहे.

--------------------------------------------------

निशा भोसलेने सांगितले की, अभ्यास करण्यासाठी धैर्य लागते. ध्येय ठरवलेले असेल तर कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही,मनात जिद्द असेल तर आपोआप यश मिळते, आई -वडीलांचे कष्ट कमी करण्याचे भाग्य लाभण्याने आनंद होत आहे.

---------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार