कोलूघाणा तेली सहकारी संघाच्या उपाध्यक्षपदी सुर्यकांत व्यवहारे, संचालकपदी संगमेश्वर फुटके, प्रा मधुकर शिंदे
परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)
येथील कोलूघाणा तेली सहकारी संघ मर्यादित परळीची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्षपदी सुर्यकांत व्यवहारे, संचालकपदी संगमेश्वर फुटके,संचालक प्रा मधुकर शिंदे यांची
नियुक्ती करण्यात आली.
तेली समाजाची १९५५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या कोलूघाणा तेली सहकारी संघ मर्यादित परळी या संस्थेची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कोलूघाणा तेली सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश लांडगे व सचिव विठ्ठल आप्पा चौधरी यांच्या वतीने उपाध्यक्ष म्हणून सुर्यकांत व्यवहारे, स्विकृत संचालकपदी संगमेश्वर नागनाथ आप्पा फुटके, प्रा मधुकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बदल संगमेश्वर फुटके यांच्या निवासस्थानी उपाध्यक्ष सुर्यकांत व्यवहारे, संगमेश्वर फुटके, प्रा मधुकर शिंदे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ट संचालक पांडुरंग कोल्हे यांच्यासह बालाजी साखरे, छगन आप्पा क्षीरसागर, भिमाशंकर फुटके, चंद्रशेखर फुटके, शिवशंकर जठार,प्रा प्रविण फुटके, सुनील लांडगे, मलिकार्जुन साखरे, तेली युवक संघटनेचे अध्यक्ष पवन फुटके, सोमनाथ वाघमारे आदि उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा