परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 देशातील युवकांनी राष्ट्र विकासासाठी योगदान द्यावे:- भागवत मसने

अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे):- देशातील युवकांनी राष्ट्र विकासासाठी योगदान द्यावे असे मत जेष्ठ टीकाकार तथा सुप्रसिद्ध कवी भागवत मसने यांनी व्यक्त केले. ते युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त  टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकल महाविद्यालयात  'राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने आयोजित व्याख्यान मालेत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य एल व्ही बगले, विभागप्रमुख प्रा. व्ही व्ही कन्नूर, श्रीमती ए ए कुलकर्णी, कु रेणुका डबीर, व्ही व्ही रावबावले, ग्रंथपाल आर बी चव्हाण उपस्थित होते. 

          कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प  व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रमुख अतिथींच्या स्वागतानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य बगले यांनी केले. तर अतिथींच्या परिचय कु क्षितिजा आगळे यानी केला.

            प्रमुख अतिथी टीकाकार तथा कवी भागवत मसने यांनी स्वामी विवेकानंद यांच्यावर बोलताना स्वामी विवेकानंदाची मातृभूमी प्रति असलेली ओढ, राष्ट्र प्रेमासाठी केलेला असीम त्याग त्याचबरोबर त्यांची  समाजाप्रति असलेली कणव याबाबत उपस्थित विद्यार्थी तथा प्राध्यापक यांच्यासमोर उलगडून सांगितली. स्वामी विवेकानंद यांची समाजासाठीची आपली बांधिलकी समर्पण तसेच दिन दुबळ्या प्रति असलेला दयाभाव या सर्व उत्तमोत्तम गुणांना वर्तमानातील युवकांनी अंगीकारून समाजासाठीची बांधिलकी जोपासण्याचे आवाहन भागवत मसने यांनी केले. स्वामी विवेकानंदाचे चरित्र व युवकांप्रती असलेल्या कविता, वात्रटिका, यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक 

मार्गदर्शन केले.

        स्वामी विवेकानंद यांनी भारतभ्रमण करतांना त्यांना आलेल्या अनुभवांवरून समाजीक बांधिलकी जोपासना करण्यासाठी तसेच उन्नतीसाठी अखंड परिश्रम घेतले. देशाचे भवितव्य हे येणाऱ्या युवा पीढीवर निर्भर असते त्यामुळे युवकांनी देखील आपल्या राष्ट्र विकासासाठी बहुमूल्य असे योगदान देण्याचे मार्मिक आवाहन स्वामी विवेकानंद यांनी   युवकांना केल्याचे सुप्रसिद्ध कवी भागवत मसने यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टी बी गिरवलकर पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक वृद यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रमुख अतिथीचे आभार  समाधान छञे यांनी व्यक्त केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!