महादेव मुंडे हत्या प्रकरण: जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी नियुक्त केलं स्वतंत्र तपास पथक
बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यावसायिक महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे आता एक्षण मोडवर आले असून या तपासा साठी त्यांनी तपास पथकाची नियुक्ती केली आहे.
महादेव मुंडे यांच्या हत्येला 16 महिने उलटूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. या प्रकरणी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या आक्रमक झाल्या आसून न्यायासाठी आता किती दिवस वाट बघायची?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पोलिसांना आरोपींना पकडण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे, अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. महादेव मुंडे यांचा खून करून मृतदेह तहसील कार्यालयाच्या आवारात टाकण्यात आला होता. या घटनेला आता 16 महिने उलटले, तरीही तपास लागलेला नाही.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मुलांसह पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत कार्यालयात नसल्याने तेथेच ठिय्या मांडला होता. पुढील १० दिवसांत या गुन्ह्याचा तपास झाला नाही, तर थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातच उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. अशात पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मोठा निर्णय घेतलाय.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास तातडीने एसआयटी किंवा सीआयडी कडे देण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली होती.
या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नवनीत काँवत यांनी पथक स्थापन केले असून या पथकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल चा समावेश असणार आहे. एलसीबी चे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार पोलिस कर्मचारी हे आती या प्रकरणाचा तपास करणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा