१० ते १२ हजार मजुरांवर बेरोजगार होण्याचा धोका !

१० ते १२ हजार मजुरांवर बेरोजगार होण्याचा धोका !

आम्हाला राख मोफत द्या अन्यथा ५ मार्च पासून उपोषण-वीटभट्टी चालक व मजूरांचा इशारा

परळी वैजनाथ  प्रतिनिधी...

       सध्या संपूर्ण राज्यामध्ये परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचा राखचा विषय जोरदार चर्चेत असतानाच या राखेवर  आधारित परळी व परिसरातील अनेक व्यवसायांवर कुऱ्हाड चालवली जात असल्याचेही एक वास्तव आहे.या राखे मधून चालणारे छोटे छोटे उद्योग व व्यावसायिक अडचणीत आले आहेत.परळी व परिसरात चालवल्या जाणाऱ्या वीट भट्टी चालकांसह या वीटभट्ट्यांवर काम करणारे जवळपास दहा ते बारा हजार मजूर बेरोजगार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे उद्योग व व्यवसाय वाचविण्यासाठी केंद्र शासनाच्या सन २००२ च्या धोरणानुसार वीटभट्टी धारकांना मोफत राख द्यावी अशी मागणी आता पुढे आली आहे.

      परळी व परिसरात मोठ्या प्रमाणावर वीट उद्योग आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार या भागात निर्माण झालेला आहे.वीट उद्योगासाठी औष्णिक विद्युत केंद्रातील राख अत्यंत उपयुक्त असल्याने दर्जेदार वीट बनते. त्यामुळे परळीच्या वीटेला महाराष्ट्रासह परराज्यातील मोठी मागणी आहे. मात्र सध्या हा उद्योग अडचणीत आला आहे. वीट बनविण्यासाठी जी राख लागते तिचा दर दिवसेंदिवस वाढत असुन यापुर्वी जी राख केंद्र शासनाच्या सन २००२ सालच्या धोरणानुसार मोफत मिळायची, तिच राख आता १५ हजार रुपये हायवा इतक्या जास्त दराने मिळत आहे. त्यामुळे वीटउद्योग चालविणे कठिण बनल्याचे दिसुन येत आहे. लेबरचे दर, ट्रान्सपोर्टचे दर, कोळशाचे दर, राखेचे वाढलेले दर यामुळे हे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे १०-१२ हजार मजूर व विटभट्टीचालक यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. 

       याबाबत परळी येथील वीटभट्टी चालक व मजूरांनी प्रशासनाला निवेदन दिले असुन वीटभट्ट्यांना मिळणारी राख ही सन २००२ सालच्या केंद्र शासनाच्या धोरणानुसार पुर्ववत मोफत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा  विटभट्टी चालक व मजूर परळी उपविभागीय  कार्यालयासमोर दि.०५.०३.२०२५ पासून उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार