एक हजार सदस्य नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान
कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे कधीच वाटलं नाही मी एकटी आहे
जालन्यात ना. पंकजा मुंडे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद
एक हजार सदस्य नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा केला सन्मान
शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या निवासस्थानीही दिली भेट
जालना ।दिनांक ०१।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जाण्यानंतर जबाबदारी वाढली, यात काम करत असतांना कार्यकर्त्यांचे एवढे प्रेम मिळाले की कधीच वाटलं नाही मी एकटी आहे, त्यामुळे माझ्यात आणि कार्यकर्त्यांत कधीच अंतर पडू देणार नाही असे भावोदगार राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे काढले.
ना. पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील भाजप संपर्क कार्यालयास भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. संतोष दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, भास्कर दानवे, सुनील आर्दड, अवधूत खडके आदींसह पदाधिकारी, नगरसेवक, सर्व तालुक्याचे मंडलाध्यक्ष यावेळी उपस्थित होते.
जिल्हयाच्या पालकमंत्री झाल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या स्वागताला प्रचंड गर्दी झाली होती, हा धागा पकडून बोलतांना त्या म्हणाल्या, गर्दी आणि मुंडे हे समीकरण जुनेच आहे. मुंडे साहेबांपासून आमचे जालना जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. केंद्रीय मंत्री म्हणून चांगले काम करणारे रावसाहेब दानवे आणि मुंडे साहेब यांनी गावोगाव जाऊन कार्यकर्ता जोडला, पक्ष वाढवला. मुंडे
साहेबांच्या जाण्यानंतर जबाबदारी वाढली तथापि काम करतांना कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे कधीच वाटल नाही मी एकटी आहे. जात धर्माच्या पलिकडे जाऊन काम करण्याचे संस्कार आमच्यावर आहेत. फंड मिळेल नाही मिळेल, एखादे काम होईल नाही होईल पण कार्यकर्त्यांमध्ये कधी अंतर पडू देणार नाही असं त्या म्हणाल्या.
एक हजार सदस्य नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान
-------
संघटन पर्व अंतर्गत एक हजार सदस्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी ना. पंकजाताई मुंडे हस्ते सन्मान करण्यात आला.पक्षाचा प्रत्येक आदेश तंतोतत पाळा. प्रत्येकाने एक हजार सदस्य करावेत आणि विक्रमी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमानंतर ना. पंकजाताईंनी लोकनेते मुंडे साहेब चौकातील मुंडे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या निवासस्थानी भेट
ना. पंकजाताई मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होण्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी घुगे परिवाराच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आ. अर्जुन खोतकर, आ. हिकमत उढाण, संपर्क प्रमुख पंडित भुतेकर यावेळी उपस्थित होते.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा