उर्मिला फुलचंद मुंडे यांचे दुःखद निधन
कन्हेरवाडी येथील राशन दुकानदार संजय मुंडे यांना मातृशोक
उर्मिला फुलचंद मुंडे यांचे दुःखद निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कन्हेरवाडी येथील राशन दुकानदार संजय फुलचंद मुंडे यांच्या मातोश्री उर्मिला फुलचंद मुंडे यांचे दिर्घ आजाराने पुणे येथे आज दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 65 वर्ष होते.
श्रीमती उर्मिला मुंडे या धार्मिक वृत्तीच्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर पुणे येथील दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दि. 25 फेब्रुवारी रोजी कन्हेरवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील गावकरी, नातेवाईक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते
कै. उर्मिला मुंडे यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कै. उर्मिला मुंडे या अंबेजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती माधवराव गणपतराव मुंडे यांच्या भावजयी तर परळीचे नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांच्या चुलती होत.
दरम्यान कै. उर्मिला मुंडे यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता सार्वजनिक स्मशानभूमी कन्हेरवाडी येथे होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा