एन. डी. आर. एफ .  चे एक दिवशीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर उत्साहात 


आपत्ती निर्वाणसाठी सतर्कतीचे कौशल्य आत्मसाथ करावे. - अरविंद लाटकर 


परळी - वैः - वसंतनगर येथे  वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दिनांक २८ जानेवारी  रोजी  युथ फॉर भारत ॲन्ड युथ फॉर डिजिटल लिटरसी ही संकल्पना घेऊन  सात दिवशीय निवासी शिबीर वसंतनगर येथे एन. डी. आर. एफ . अर्थात  नॅशनल डिसास्टर रिस्पॉन्स फोर्स , राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना व तहसील कार्यलय यांच्या वतीने एक दिवशीय आपत्ती व्यवस्थापन शिबीराचे उद्घाटन जिल्हायाचे  उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी एन. डी. आर. एफ . चे दलच्या प्रशिक्षण प्रमुख राजु प्रसाद यांनी  १५० युवक - युवतीनी    प्रशिक्षण दिले. यावेळी तहसिलदार व्यकंटेश्वर मुंडे, नायब तहसिलदार रूपनर, प्राचार्या अर्चना चव्हाण, प्राचार्य अरुण पवार, प्रा. डॉ. पी. एल. कराड , प्रा. हरिश मुंडे,  सरपंच शाहु विजय राठोड , एन. एस. एस. चे  प्रा. डॉ. माधव रोडे, एन. सी. सी. प्रा. गणेश चव्हाण आपत्ती दल सहाय्यक अनिल पाटील सह चौथा जनाची उपस्थिति होते. 

यावेळी आपत्ती दलाचे निरीक्षक राजु प्रसाद यांनी आपत्ती व्यवस्थापनतील नैसिर्गक संकटाचा सामना कसा करायाच यासाठी प्रात्यक्षिके सादर केले. तसेच संकट काळी आपल्याकडे कोणते साहित्य नसले तरी आपल्या जवळील सर्वसाधरण वस्तुच्या सहय्याने आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो . हदय विकार , घशा मध्ये काही अडकले ,  अपघातातील जखमी व्यक्ती जीव वाचवण्याचे कौशल्य शिकवले , जंगली प्राण्याचा सामना करण्याचे प्रशिक्षण दिले, यावेळी कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक जिल्हा उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर  म्हणाले, कुठलीही आपत्ती सांगुन येत नाही , आपत्ती आली तरी धाडसाने सामोरे गेले पाहिजे. त्याप्रसंगी स्वतःची सुरक्षिता पाहत दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. संकंट प्रसंगी दिखाऊ पणाने माणुसकी हरवते संकट परिस्थिती अडचणीत आलेल्या माणसाला सुरक्षा देणे , त्याचा जिव वाचवणे महत्वाचे, आपत्ती व्यवस्थपनाच्या रक्षणासाठी युवकांनी तांत्रिक आपत्तीतील कौशिल्याची अभ्यास असणे गरजेचे आहे. प्रत्येकांने आपल्या आधार कार्डच्या झेरॉक्स पेपर मागे आपल्या घरच्या जवळया नातातील पाच व्यक्ती नावे व फोन नंबर सोबत बाळगावे त्यामुळे आपत्ती काळी संपर्क करण्याचा मत होईल असे  एस. डी. ओ . अरविंद लाटकर म्हणाले. या कार्यक्रमाचे आयोजन एन. डी. आर. एफ . व एन. एस. एस . आणि एन. सी. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन प्रा. डॉ. माधव रोडे यांनी केले , तर  प्रा. डॉ. भिमानंद गजभारे , प्रा. एम. जी. लांडगे , प्रणव आघाव , अशिष मुंडे , किरण गुट्टे , महेश मुंडे ,  सागर जगताप , युवराज गीत्ते , करण गुट्टे , चौतन्य गीत्ते , अभिजीत रोडे , सक्षम सरवदे , आरती शिंदे , संध्या रोडे , शितल मुंडे , अफरीन पठाण,  नम्रता सरवदे , शुभंगी कांचनवाड , तेजस्वणी साबळे , नेहा आदोडे , ऋजीचा साळवे , मनिषा कातकडे , श्रीलेखा एस. मुंडे , प्रतिक्षा साखरे अदि. होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार