अभीष्टचिंतन लेख >>> ✍️ संतोष जुजगर

बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक :प्रा.अतुल दुबे यांचे ‘अतुलनिय’ कार्य

परळीच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग


नेतृत्वाचा वारसा अनेकांना चालत येतो. या नेतृत्वात संवेदनशीलपणा असेलच असे नसते. परंतु ज्याला नेतृत्वाचा वारसाही नाही आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर  ज्याला कळवळा येतो असे नेतृत्व हे अपवादानेच उदयाला येते. सर्व सामान्यांतुन उदयास आलेल्या नेतृत्वामध्ये एक प्रकारचे संवेदनशीलता भरलेली असतेच त्याचबरोबरीने आक्रमताही तेवढ्याच तीव्रतेने असते हे दिसुन येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे परळी शहरातील एक युवा नेतृत्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक प्रा.अतुल दुबे सर या धडपडत्या युवकाच्या रूपाने पहावयास मिळते. वेगवेगळ्या माध्यमातून व एक ध्येय समोर ठेवून सर्वसामान्यां प्रती असलेल्या जिव्हाळा अनेक आंदोलने व अनेक प्रश्नांची सोडवणुक करताना त्याच्यातील संवदेनशीलतेचा प्रत्यय नेहमीच पहावयास मिळाला. तसेच परळी शहराच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अतुलनिय असणारे, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित श्री वैद्यनाथ भक्ती मंडळाचे सेवेकरी म्हणून धार्मीक कार्यात अग्रेसर असणारे  प्रा.अतुल दुबे सर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमीत्त त्यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.


प्रा.अतुल दुबे सर हे त्यांच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये सर या नावानेच परिचीत आहेत. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून स्वत:च्या राजकीय कारर्किदीला त्यांनी सुरूवात केली. शिवसेनेच्या ज्वलंत विचारांशी निष्ठा ठेवून विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न , छोट्या-मोठ्या अडीअडचणी सोडवत सोडवत हा युवक नेता मोठ-मोठी आंदोलनेही करू लागला. अल्पवधीतच त्याने शहरात आपल्या कार्य कर्तुत्वाने स्वत:चा ठसा उमटवला. केवळ  प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा त्याने लोकांचे प्रश्न सोडवण्याला अधिक महत्व दिले. विद्यार्थी सेनेचे तालुका तालुकाप्रमुख पद त्यांच्याकडे आल्यानंतर त्याच्यातील नेतृत्व गुणांचा खरा विकास झालेला आढळून येतो. न्याय मागण्यासाठी त्याचा आक्रमकपणा अगदी उफाळून आलेला दिसतो.  विद्यार्थी सेनेचे काम करीत असताना त्यानी युवकांची एक मोठी फळी उभी केली. सर्व सामान्य घरातील युवकांना चळवळीमध्ये आणुन त्याने त्याच्यातील स्वाभीमान जागृत केला. वेळप्रसंगी अनेक अडचणीचा सामनाही त्याने केला. परंतु न्याय मिळवून देताना मात्र त्याने कशाचाही विचार केलेला नाही. युवकांचे मोठे संघटन करण्याचे कौशल्य त्याच्या अंगात जन्मजात दिसुन येते. युवकांच्या प्रश्नांची जाण त्याना असते. युवकांप्रती त्याची असलेली आत्मयीता नेहमीच दिसुन येते.  त्यामुळेच त्याच्या जवळ आलेला युवा कार्यकर्ता आणि पक्ष विरहित मित्रपरिवार त्यांच्या पासुन दुर गेलेला दिसुन येत नाही.  त्याचे हे कार्य पाहुन त्याच्याकडे काही काळ विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा प्रमुख व त्या नंतर विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख आणि युवासेना बीड जिल्हा समन्वयक हे पद सुद्धा देण्यात आले. या पदाची जबाबदारी त्यानी अतिशय जबाबदारीने पार पाडली.  शिवसेनेची विचार सरणी घेवून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविताना त्याच्यातील संवेदनशील मन मात्र त्याने जपुन ठेवले. त्याच्या या गुणामुळेच अनेकांना अतुल आपलासा वाटतो. अनेक जण त्याला जवळचा समजतात आणि ते लोकांची कामे तेवढ्याच आत्मयीतेने करताना दिसतात. शिवसेना नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली तो सर्वसामान्यांची कामे तळमळीने करत आहे. त्यामुळे सर्वच स्तरात त्याचे नाव घेतले जाते. जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणच्या माध्यमातून त्यानी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. विविध महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी साजर्या करणे त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविणे , शालेय , महाविद्यालयीन युवकांसाठीचे उपक्रम राबविणे, बेरोजगारांचे प्रश्न सोडविणे, सर्व सामान्यांच्या नागरी समस्या सोडविणे याच बरोबर पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सतत कार्यरत राहणे हे त्याच्या व्यक्तीमत्वाचे विशेष पैलु आहेत.  त्यांनी केलेले छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायाच्या अश्वारूढ पुतळ्याबाबतचे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथच्या शिवलिंगावरील चांदीचे आवरण(अलंकार) काढून शिवभक्तांना मूळ शिवलिंगाचे दर्शन व्हावे यासाठी केलेले आंदेालन हे लक्ष वेधी ठरले. त्याचबरोबर युवक युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी श्री हनुमान व्यायाम शाळा व दयानंद शाळेच्या माध्यमातून लाठी-काठी, दांडपट्टा, कराटे तलवारबाजी प्रशिक्षणासाठी उन्हाळ्याच्या आणि दीपावलीच्या सुट्टी मधील आपला अमूल्य वेळ देताना आम्ही पाहत आहोत.सर्व सामान्यांमधुन निर्माण झालेले हे युवा नेतृत्व उत्तरोत्तर खुलत राहावे हीच सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा असुन अशा नेतृत्वाला पाठबळ मिळणे आवश्यक आहे. अतुल दुबे हा युवक तळमळीने सर्व सामान्यांचे प्रश्न  सोडविण्यासाठी धडपड करतो आहे. त्याच बरोबर शहरात सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे यासाठी त्याचा विशेष प्रयत्न आहे. कला, साहित्य, शिक्षण, समाज या सर्वच क्षेत्रात त्याचा वावर आढळतो. प्रत्येक क्षेत्रातील लोकांशी वागताना त्याचा नम्रपणा नजरेत भरणारा असतो. त्यामुळे प्रत्येक जण त्याच्याकडे आदराने पाहतो. वेळप्रसंगी नम्र असणारा हा युवा नेता आक्रमक ही होताना दिसतो.त्याच्यातील संवेदनशीलता हीच त्याची खरी ओळख आहे. त्याच्या या गुणांची दिवसेंदिवस वाढ व्हावी, त्याचे नेतृत्व अधिकाधिक बळकट व्हावे त्याच्या सर्व संकल्पना यश मिळावे व त्याच्याकडून सतत अखंडीत अशी जनसेवा घडावी हीच त्याच्या वाढदिवसानिमीत्त प्रभु वैद्यनाथाच्या चरणी नम्र प्रार्थना आहे.

✍️संतोष जुजगर

परळी वैजनाथ




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार