इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

घरफोड्यांनी पसरली दहशत

घरफोड्यांनी पसरली दहशत: परळीतील शक्तीकुंज वसाहतीत घरफोडीचे सत्र : 4 लाख 51 हजारांचा ऐवज लंपास 

पोलिसांनी श्वानपथकासह फॉरेन्सिक तपासाला दिली गती 

परळी /प्रतिनिधी    

  परळी वीज निर्मिती केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शक्तीकुंज वसाहतीत घरफोडीचे सत्र सुरू असुन एका मागे एक अनेक कर्मचाऱ्यांच्या घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.चोरीच्या घटना पाहता मुख्य अभियंतांनी वसाहतीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्या कडे  लक्ष देण्याची गरज आहे.

 ‌याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वीज निर्मिती केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शक्तीकुंज वसाहतीत अनेक बिल्डिंग आहेत. या बिल्डिंगमध्ये अनेक कर्मचारी राहत असतात. कर्मचारी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेऊन त्यांच्या कॉटरमध्ये अज्ञात चोरांकडून चोरी केली जात आहे. 20 डिसेंबर रोजी सुग्रीव विष्णू शेप यांचे कॉटर फोडून चोरट्यांनी दोन लाख 35 हजार 500रुपयांची चोरी केली होती. त्यानंतर लागोपाठ सखाराम घुगे, पवार, सुनील चाटे, रत्नमाला देशमुख , सुग्रीव शेप यांच्या घरी चोरी झाली. 

    चोरट्यांचे हे थर्मल काॅलनी मधील चोरीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संजीव मुंडे यांच्या  ई 14 बिल्डिंग मधील कॉटर नंबर 79 या त्यांच्या घरातील ते घरी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी नगदी 50 हजार रुपये व तीन लाख 86 हजार रुपयांची सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.एकूण 4 लाख  51 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं 28/2025 कलम 331(3), 331(4), 305(a),भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        या चोरीच्या घटनांनी वसाहतीतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कर्मचाऱ्यांच्या घरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकापाठोपाठ एक होणाऱ्या या चोरीच्या घटनांची संभाजीनगर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. चोरांचा तपास करताना पोलिसांनी चोरांच्या मागावर श्वान पाठविले. तसेच ज्या ज्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या त्या घरातील फिंगरप्रिंट पोलिसांनी हस्तगत केले आहेत. फॉरेन्सिक तपासाच्या आधारे लवकरात लवकर चोरापर्यंत पोहोचू असे संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले आहे. तर या कामी एपीआय प्रवीण जाधव, पीएसआय अनिल शिंदे हे ही जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!