संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-
बंजारा समाजाचे आराध्य दैवत व महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने सेवालाल महाराज चौक , अंबाजोगाई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. .
या कार्यक्रमाला भाजपाचे युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा, अ.भा. बंजारा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मधुकरभाऊ राठोड, जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब शेप, सरपंच आरडी नायक, पवन चव्हाण, साहेबराव पवार, मधुकर जाधव, अजय जाधव अजय राठोड, प्रकाश आडे, शेषराव आडे, बाबा आडे, सुरेश आडे, नवनाथ राठोड, कृष्णा आडे राष्ट्रीय महासचिव शरदभाऊ राठोड, तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंजारा समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते. सरपंच भाऊसाहेब राठोड यांचीही या वेळी विशेष उपस्थिती होती.
संत सेवालाल महाराज यांनी आपल्या आयुष्यभर बंजारा समाजाच्या उत्थानासाठी योगदान दिले. त्यांचा जीवनसंघर्ष, समाज सुधारण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांचे तत्त्वज्ञान आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित विचारांचा प्रसार केला.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या भाषणांतून संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचा उजाळा दिला. मधुकरभाऊ राठोड यांनी सांगितले की, "सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, बंधुता आणि निस्वार्थ सेवा करण्याचा संदेश दिला आहे. आपण त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाज उन्नतीसाठी काम केले पाहिजे."
भाजपाचे युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा यांनीही आपल्या भाषणात संत सेवालाल महाराजांचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. "आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेऊन समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे," असे ते म्हणाले.
शरदभाऊ राठोड यांनीही संत सेवालाल महाराज यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले. "त्यांच्या विचारांचा जागर केल्यास समाजात समरसता आणि बंधुता वाढीस लागेल," असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि नागरिकांनी श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता जयघोषाने करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा