परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

५ लाख ५५ हजार रु. चा मदतीचा धनादेशही सुपूर्द!

 संतोष देशमुखांच्या पत्नीला नोकरीचे नियुक्ती पत्र प्रदान

केज :- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना आडस ता. केज येथील श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित छ्त्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाने विशेष बाब म्हणून त्यांच्या या पद भरतीस मान्यता दिली असून संस्थेचे सचिव रमेश आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर चव्हाण यांनी मस्साजोग येथे जाऊन त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. 

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडा नंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. अशी ग्रामस्थांची आणि विविध स्तरातून मागणी केली होती. त्या नुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण संस्थेतील नोकरी बंद असल्याने विशेष बाब म्हणून पद भरतीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देऊन देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना छ्त्रपती.शिक्षण संस्था आडस संचलित श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ विद्यालय आडस येथे लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. 

त्यांना सुरुवातीचे तीन वर्षे परिविक्षाधीन कालावधीसाठी त्यांना प्रती महिना १० हजार रु. मानधन देण्यात येणार असून त्या नंतर मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. 

शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी श्री. छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव रमेश आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर चव्हाण यांनी मस्साजोग येथे जाऊन अश्विनी देशमुख यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. यावेळी रमेशराव आडसकर, राजेश्वर देशमुख आणि देशमुख यांच्या मातोश्री शारदाताई देशमुख, भाऊ धनंजय देशमुख, माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर, केजचे उपनगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, दिलीप गुळभिले, चिंचोली माळीचे सरपंच सुनील देशमुख, साळेगावचे सरपंच कैलास जाधव, सारणी (आ.) चे सरपंच संतोष सोनवणे, रंजित आडसकर हे उपस्थित होते.

मदितीचा धनादेश :- या वेळी रमेश आडसकर यांनी देशमुख कुटुंबीयांना नोकरीच्या नियुक्ती पत्रा सोबतच ५ लाख ५५ हजार रु. चा मदतीचा धनादेश देखील सुपूर्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!